May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

यवतमाळ शहरातील मद्य – प्रेमींना आनंदाची बातमी

सकाळी 9 ते 5 या वेळात मद्यविक्री सुरु

यवतमाळ , दि. 24 – यवतमाळ व नेर नगरपरिषद हद्दीतील (कंटेनमेंट झोन वगळून) एफएल-2 / एफएल – बिआर – 2/सीएल -3 अनुज्ञप्तीचे व्यवहार खालील अटीचे अधीन राहून चालू करून देण्याची परवानगी देण्यात येत आहे. एमएल-2/एफएलबिआर-2 तसेच सीएल -3 मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढील निकषांच्या आधारे चालू करता येतील व सदर अनुज्ञप्ती प्रकारातून फक्त सीलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरु करता येतील. तर शहरी भागातील नगर परिषद हद्दीतील मॉल्स मधील मद्यविक्री दुकाने चालू करता येणार नाही. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची अनुज्ञप्ती सुरु करता येतील. सीलबंद मद्यविक्री करणाऱ्या दुकानासमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत व दोन ग्राहकामध्ये किमान 5 फुट अंतर असणे अनिवार्य राहील. त्याकरीता दुकानासमोर प्रत्येक सहा फुटावर वर्तुळ आखून घ्यावीत अनुज्ञप्ती सुरु करतेवेळी ग्राहकांना त्या मार्किंगमध्ये उभे राहण्याचे निर्देशीत करावे.

ग्राहकांना सदर मागणीपत्राचा नमुना दिल्यांनतर त्यांना टोकन क्रमांक देण्यात यावा. संबंधीत अनुज्ञप्तीधारकाने सर्व नोकराने / ग्राहकांची स्कॅनींग करावी व ज्या नोकरास / ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत अश्या व्यक्तींना दुकानात प्रवेश देवू नये तसेच दुकानातील प्रत्येक नोकराने व ग्राहकांने डिस्पोजल मास्क आणि ग्लोवज वापरणे बंधनकारक राहील. दुकान व सभोवतालचा परीसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकासाठी हॅन्ड रबर सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्तीधारकाची राहील. अनुज्ञप्ती सिलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत राहील. मुंबई विदेशी मद्य नियम 1953 चे नियम 70 डी अन्वये विहीत केलेले मद्य बाळगणे / खरेदी करणे याच्या क्षमतेच्या भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत आस्थापनेमध्ये मद्य प्राशन होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी बाब आढळल्यास प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल. उपरोक्त मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास आपली अनुज्ञप्ती तात्काळ बंद करण्यात येईल. व प्रचलित कायद्यांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील सिलबंद किरकोळ मद्यविक्री करणाऱ्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात सहजरित्या दिसेल असा फलक लावणे बंधनकारक आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!