
लक्ष्मण बिलोरे
जालना – डिव्हिजन पेट्रोलिंग च्या दरम्यान भोकरदन ते जालना रोडवर चार चाकी वाहनाचा पाठलाग करून पकडण्यात आले व तिच्यामध्ये १६,८०० रुपयांच्या देशी दारूचे बॉक्स मिळून आले.
याविषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक १५मे रोजी रात्री हसनाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन शेळके हेआपल्या फौज फाट्यासह डीविजन पेट्रोलिंग करत असताना भोकरदन ते जालना रोडला जाणारे चारचाकी वाहन टाटा गोर गाडी क्रमांक एम एच २१ BF ४६४२ या गाडीचा पाठलाग करून त्या गाडीला जवखेडा बुद्रुक येथे पकडले परंतु अंधाराचा फायदा घेत गाडीचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाला गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिकीमध्ये देशी दारूचे पाच बॉक्स मिळून आले त्याची किंमत १६,८०० रुपये व गाडीची अंदाजे किंमत तीन लाख रुपये असा एकूण ३ लाख १६,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई पोलिस अधीक्षक एस चैतन्य अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली हसनाबाद पोलीस स्टेशनचे सपोनि शेळके पो हे कॉ चव्हाण पो कॉ अनिल डुरे दुर्गेश राठोड परमेश्वर टेपले यांनी कारवाई केली असून सदरील गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक सुभाष चव्हाण हे करीत आहेत.











































