Home मराठवाडा डाक विभागाने सुट्टीच्या दिवशी मेडिकल पार्सल वाटप

डाक विभागाने सुट्टीच्या दिवशी मेडिकल पार्सल वाटप

48
0

नांदेड / माहूर , दि.१८ :- कोरोनाच्या महामारीत डाक विभागाने स्पेशल सेवा.
आजारी रुगणाचे मेडिसिन वाटप करण्यासाठी सेवा रात्रंदिवस करीत आहेत.

या जन्मावर… या जगण्यावर..
शतदा डाक सेवे वर.. प्रेम करावे..
शतदा डाक सेवे वर.. प्रेम करावे.
या जन्मावर.. या जगण्यावर..
शतदा डाक सेवे वर.. प्रेम करावे….
शतदा डाक सेवे वर.. प्रेम करावे….
चंचल वारा… या जलधारा..
या जन्मावर..या जगण्यावर..
शतदा डाक सेवे वर… प्रेम करावे..
शतदाडिस्क सेवे वर … प्रेम करावे..

■ वार्तापत्र:सुरेश सिंगेवार [ विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड.”]

सर्व वाहतुकीचे मार्ग बंद असताना देखील डाक विभाग आजारी रुगणाची औषधी व गोळ्या स्पीडपोस्ट व पार्सल ने बुकिंग झालेले औषधी रेल्वे मालगाडी किंवा डाक विभागाच्या विशेष चारचाकी व्हानाने ती औषधी घरपोच रुग्णाला वाटप करण्यात येत आहे.

जलदगतीने औषधी वाटप केल्याबद्दल मा.डाक अधीक्षक नांदेड. व डाक निरीक्षक किनवट यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचे फोन द्वारे अभिनंदन केले आहे.

आज सुट्टी असताना देखील माहूर पोस्ट ऑफिसचे कोरोना योद्धा सबपोस्ट पोस्ट मास्तर श्री.कोळी व डाक आवेक्षक किनवट. श्री.रोशन भालेराव यांनी मुबंई येथुन माहूर येथे आलेली औषधी वेळ न करता त्वरित माहूर येथील श्री. प्रकाश वाहुले यांच्या नावे आलेली महत्वाची मेडिसिन रविवारच्या सुटीच्या दिवशी वाटप केली आहे.
डाक कर्मचारी एकाच वेळेस डाक सेवा,बँक सेवा,व आरोग्य सेवा या सेवा संकटकाळी घरपोच करीत आहेत.
खरंच डाक कर्मचाऱ्यांत देव पाहवयास मिळत आहे. अशी चर्चा नागरिकांत होत आहे.
या दोन्ही कर्मचाऱ्यांना सलाम.

Unlimited Reseller Hosting