May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाहिली श्रद्धांजली

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

कोरोना संकटात कर्तव्य बजावताना वीर मरण आलेल्या मुंबईतील (धारावी) शाहूनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांना वीर मरण आले.

या घटनेची माहिती प्राप्त होताच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शाहूनगर पोलीस ठाण्यात जाउन श्रद्धांजली अर्पण केली. या दु:खद प्रसंगी शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग, अपर पोलीस आयुक्त विनय चोबे उपस्थित होते.
कोरोना संकटात कर्तव्य बजावताना आपले पोलीस बांधव मृत्युमुखी पडत आहेत. त्याचे दु:ख आहे. हे युद्ध संपूर्ण जगात मानवाला वाचवण्यासाठी सुरू आहे. कोरोनाचा मुकाबला आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. काळजी करू नका, पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभे आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी भाऊक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. या सर्व अधिकारी व कर्मचार्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिंमत दिली. त्यानंतर त्यांनी धारावीच्या विविध भागांमध्ये जाऊन पाहणी केली. तेथे बंदोबस्तात असलेल्या कर्मचार्यांसोबत सुद्धा त्यांनी संवाद साधला.
दरम्यान, रस्त्याने जाताना जमलेल्या सफाई कामगारांशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संवाद साधला. काम करताना अडचणी येत असतील तर त्या स्पष्ट सांगा. शासन आपल्या पाठीशी आहे, असाही दिलास त्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!