Home महत्वाची बातमी बेडरूम मध्ये चला पतीने ऐकले नाही??? अन विपरितच घडले ,

बेडरूम मध्ये चला पतीने ऐकले नाही??? अन विपरितच घडले ,

96

अमीन शाह ,

मुंबई

लॉकडाऊन मुळे सध्या सर्व जण घरीच असल्याने पती-पत्नी यांच्यात अनेक वाद देखील वाढत आहेत. पती सतत घरी असल्याने वाद वाढत जातात मात्र मुंबईतील ह्या घटनेत पती पत्नीच्या भांडणात पतीचा जीव थोडक्यात वाचला. त्याचे झाले असे की, पती घरी असल्याने लिव्हिंग रुममध्ये झोपलेला होता मात्र पत्नीने त्यांना बेडरूममध्ये झोपण्यास सांगितले मात्र त्यांनी दुर्लक्ष केले त्यावरून चिडलेल्या पत्नीने नवऱ्याच्या अंगावर थेट उकळते पाणी फेकले. उकळते पाणी फेकल्याने पती गंभीर भाजला आणि त्याला चक्क दवाखान्यात ऍडमिट करण्याची वेळ आली. सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना मुंबईतील बोरिवली पश्चिमची आहे, ए ए. दळवी (वय ६५) आणि त्यांची पत्नी शायनाज (वय ६२) हे ओल्ड एमएचबी कॉलनीत राहतात. सायंकाळी ५ वाजता दळवी त्यांच्या फ्लॅटमधील लिव्हिंग रूममध्ये झोपलेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी शायनाजने त्यांच्यावर ओरडण्यास सुरुवात केली आणि दळवींना बेडरूममध्ये झोपायला सांगितलं. मात्र, तिच्या बोलण्याकडे दळवींनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं मात्र तिच्या आरडाओरडीमुळे त्यांना झोपही लागत नव्हती. मात्र आपल्या ओरडण्याचा काही परिणाम होत नाही हे पाहून थोड्यावेळाने शायनाज या किचनमध्ये गेल्या आणि काहीवेळाने उकळत पाणी घेऊन बाहेर आल्या आणि हे उकळतं पाणी दळवींच्या अंगावर फेकलं. त्यामुळे दळवी प्रचंड भाजले.
त्यानंतर त्यांना तात्काळ कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कुपर रुग्णालयात ऍडमिट करण्याची वेळ आली. कुपरमध्ये तीन दिवस उपचार घेतल्यावर त्यांना डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यावर दळवींनी घरी न जाता आधी थेट पोलीस स्टेशन गाठून पत्नीविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शायनाज विरोधात भादंवि कलम ३२४, ३३८ आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शायनाजला अद्याप अटक करण्यात आली नाही.तिच्या या भांडणाला वैतागून मुलानेही काही वर्षांपूर्वी घर सोडले आहे, असं दळवी यांनी पोलिसांना सांगितले आहे .