Home मराठवाडा वाह रे भाऊ ??? आपल्या लहान अल्पवयीन बहिणीलाच बनविले शिकार ????

वाह रे भाऊ ??? आपल्या लहान अल्पवयीन बहिणीलाच बनविले शिकार ????

26
0

नात्याला काळिमा फासणारी घटना ,

अमीन शाह

जालना, 16 मे : राज्यात बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाचा व्हायरस फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असतानाही अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासत आपल्या 12 वर्षीय सख्या चुलत बहिणीवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जालना शहरातील दर्गावेश परिसरात ही घटना घडली आहे. सदर बाजार पोलिसांनी आरोपी नराधमाला तात्काळ बेड्या ठोकत तुरुंगात टाकलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील दर्गावेश परिसरात राहणाऱ्या अमोल ढवळे या 20 वर्षीय नराधमानं आपल्याच 12 वर्षीय सख्ख्या चुलत बहिणीवर तिच्याच खोलीत जाऊन लैंगिक अत्याचार केला.
खरंतर, भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो. पण आपल्या अल्पवयीन बहिणीवर अशा प्रकारे अत्याचार केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ही घटना घडलेल्यानंतर पीडित तरुणीने प्रकरणाची माहिती आईला सांगितली. त्यांनतर आईने तात्काळ पोलिसांत धाव घेत घटनेची माहिती दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवलं असून तिची आरोग्य चाचणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Unlimited Reseller Hosting