Home विदर्भ कोरोना आपत्तित प्रतिबंधित इंदिरा नगर , पवार पूरा , हिन्दू स्मशानभूमि गेट...

कोरोना आपत्तित प्रतिबंधित इंदिरा नगर , पवार पूरा , हिन्दू स्मशानभूमि गेट परिसरातिल नागरिक अडचणीत…

121

शासनाने आपत्ती व्यवस्थापनान्तर्गत गरजू कुटुंबाना तात्काळ मदत करावी-नगरसेवक जावेद अंसारी यांची मागणी….!

यवतमाळ – कोरोनामुळे प्रतिबन्धित इंदिरा नगर,पवार पूरा,हिन्दू स्मशानभूमि गेट परिसरात गरीब गरजू कुटुबाना प्रशासनाच्या वतीने तात्काळ दैनदिन किराना सामान,भाजी, दूध वाटप करावा,अशी मागणी राहुल गांधी विचारमंच चे जिल्हाध्यक्ष व या भागाचे नगरसेवक जावेद अन्सारी यांनी प्रशासनाला प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे.यात नगरसेवक अन्सारी यांनी म्हटले आहे की,कोरोना बाधित लोक मिळत असल्याने व कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शहरातील दाट रहिवासी क्षेत्र असलेल्या इंदिरा नगर,पवार पूरा,हिन्दू स्मशानभूमि गेट परिसर भागाला प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे.या भागात चौफेर पोलिस बंदोबस्त व या क्षेत्राबाहेर येण्यास मनाई असल्यामुळे नागरीकांना सुध्दा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.आतापर्यन्त जिल्हा प्रशासन , नगरपरिषद,आरोग्य विभाग ,पोलिस विभाग आपला या प्रतिबन्धित भागात आपले प्रशासकीय काम पार पाड़त आहे, मात्र येथे राहणारे नागरिक रोजमजूरी व छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुबांचा उदरनिर्वाह करतात,मात्र लोकड़ाऊन व प्रतिबन्ध क्षेत्र घोषित झाल्याने या ठिकाणी तब्बल 50 दिवसांपासून नागरिक घरातच बंदिस्त आहेत. त्यांचे कामकाज पूर्णतः बन्द असून या हजारो गरीब लोकांच्या घरात खान्यापिण्याची सोय नाही.प्रतिबन्ध असल्याने हे लोक सार्वजनिक संचार व कामकाज करू शकत नाही,आम्ही या भागाचे जनप्रतिनिधि म्हणून आपले कर्तव्य,सेवाभाव व सामाजिक कर्तव्य या भावनेतून 2 वेळा या भागात स्व खर्चातुन सर्व कुटुंबाना राशन किट,भाजी पाला वाटप केला.शिवाय कांग्रेस कमिटी कडून सतत दूध वाटप व विविध सामाजिक संघटनानीही किराना साहित्य वाटप केले.अनेक दिवस बंदिस्त होऊन लोटल्याने आता या कुटुंबाना मिळालेला अन्नधान्य ही सम्पला आहे,
येथील गरीब नागरिकांचे कामकाज बन्द असल्याने ते आर्थिक अड़चनीतही आहेत, या परिस्थितीत त्यांना प्रशासनाकडून आपत्ति व्यवस्थापन अंतर्गत मदत ही मिळत नाहीये,त्यामुळे येथील गरीब कुटुंबांची अडचणीत वाढ झाली आहे.येथे सामाजिक संघटन व या भागाचा जनप्रतिनिधी म्हणून आतापर्यन्त मदत करण्याची आपली क्षमता वापरली आहे.

तर दुसरीकडे,जिल्हाधिकारी,नगरपरिषद प्रशासन,आरोग्य विभाग या प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार येथे काम करीत आहेत व येथील नागरिकही प्रशासनाला सहाय्य करीत आहेतच,मात्र आता प्रशासनाने स्वतः येथील गरीब,गरजू नागरिकांची दैनंदिन गरज व प्रतिबंधित नागरिकांची अडचणी लक्षात घ्यावी व प्रतिबन्ध हटे पर्यन्त इंदिरा नगर,पवार पूरा,हिन्दू स्मशानभूमि गेट परिसरात आपत्ती व्यवस्थापन कायदा व शासकीय नियमानुसार प्रशासनाने येथील गरीब कुटुंबाना तात्काळ निशुल्क किराना साहित्य,फलभाजी,दूध व जीवनावश्यक वस्तु सह गरजुना त्यांना लागनारी विविध औषधी वाटप करावी अशी मागणी नगरसेवक जावेद अन्सारी यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे राज्य शासन व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना केली आहे.