Home मराठवाडा धर्मवीर छत्रपती शंभूराजे जयंतीनिमित्त गणेश शिराळे मित्र मंडळाचे रक्तदान

धर्मवीर छत्रपती शंभूराजे जयंतीनिमित्त गणेश शिराळे मित्र मंडळाचे रक्तदान

33
0

बीड , दि. १५ – (प्रतिनिधी) – स्वराज्याचे पहिले युवराज आणि धाकलं धनी युगंधर धर्म रक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त बीड येथील गणेश शिराळे मित्रमंडळाने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व संसर्ग याचा ग्राह्य धरून सर्व बाबी पाळून प्रथमता शासकीय रुग्णालय बीड येथे रक्तसंक्रमण विभागात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून.
छत्रपती शंभू महाराजांना अभिवादन केले त्यानंतर डिस्टन्स ठेवून एकेकाने जाऊन रक्तदान करण्यास सुरुवात केली तब्बल 35 शंभूराजे भक्तांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून छत्रपती शंभू महाराजांचा इतिहास व त्यांनी गाजलेला काळ सध्याच्या युवकांना कसा प्रेरित आहे तरुणाचा सळसळतं रक्त समाजासाठी व स्वराज्यासाठी कसं काम होऊ शकतं हे संभाजी महाराजांच्या विचारातून शिकार मिळते त्याच उद्देशाने गणेश शिराळे मित्र मंडळ बीड व रौद्र शंभो महाराज जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा विचार तरुणांमध्ये व आपण केलेल्या कामाने अर्थातच रक्तदानाने गरजूंना व रुग्णांना मदत मिळावी म्हणून आहे या सामाजिक उपक्रमासाठी मार्गदर्शक गोरख आबा शिराळे यांच्या आदेशाने अक्षय भैय्या शिराळे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमासाठी उपस्थित आयोजक गणेश शिराळे,रोहित शिंदे,स्वराज चव्हाण,विष्णूबाळ झोडगे ,अश्विनी टाक, रेवन गायकवाड , अजिंक्य वडमारे, तेजस भोसले,स्वप्नील चव्हाण, शैलेश सोनकांबळे आकाश कुठे प्रसाद उबाळे,विकी बोराडे, रोहित वाघमारे,ईश्वर माने ,विकास भोसले व समस्त गणेश शिराळे मित्र मंडळ बीड उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting