Home सोलापुर बोरगाव दे. येथील नागरिकांना  जिल्हा परिषद शाळेत क्वॅरंटाईन…

बोरगाव दे. येथील नागरिकांना  जिल्हा परिषद शाळेत क्वॅरंटाईन…

271

कोरोना प्रतिबंधक समिती ने केली व्यवस्था…

वागदरी / नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – तालुक्यातील , बोरगाव दे. येथे बाहेरगावाहून येणा-या नागरिकांना तहसीलदार अक्कलकोट यांच्या आदेशानुसार व गटविकास अधिकारीसो यांच्या मार्गदर्शनाखाली बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत क्वॅरंटाईन करण्यात येत आहे.

बाहेरून येत असलेल्या नागरिकांची संख्या व जिल्हा परिषद शाळेत उपलब्ध जागा लक्षात घेऊन ज्यांना स्वताच्या शेतात राहणे शक्य आहे, ज्यांच्या शेतात तात्पुरता निवारा उपलब्ध आहे अशा नागरिकांना शेतात क्वॅरंटाईन करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे असा निवारा उपलब्ध नाही किंवा स्वताची शेती नाही आशा नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत क्वॅरंटाईन केले जात आहे.

क्वॅरंटाईन केलेल्या नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था, लाईट ची व्यवस्था, फॅन ची व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता इत्यादी व्यवस्था सुरळीत करणेकामी सरपंच व समिती सदस्यांनी स्थळपाहणी केली. व सोयीसुविधेसाठी जुळवाजुळव केली. सदर व्यक्तींना त्यांच्या घरातून जेवणाचा डबा पोहोच होत असून दक्षतेचा भाग म्हणुन वेगळ्या भांड्यातून जेवण वाढण्याची व्यवस्था केली जात आहे. याबद्दल क्वॅरंटाईन कक्षातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत चौदा दिवसानंतर आम्ही आमच्या घरी जाऊ. आमच्यामुळे गावाला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याची आम्ही खबरदारी घेत राहू. अशी भावना व्यक्त केली.

यावेळी सरपंच विलासराव सुरवसे, तलाठी सिध्देश्वर जाधव, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण भैरामड्गी, पोलीस पाटील अभिजित पाटील, प्रा. प्रकाश सुरवसे, मुख्याध्यापक बनाजी बोलकोटे, ग्राम. सदस्य महंमद पठाण, कोतवाल सुनील मुलगे उपस्थित होते.