Home विदर्भ शहरातील लॉकडाऊन काळात दारू चा काळाबाजार करणाऱ्या बार चालकांना मनसेचा दणका….

शहरातील लॉकडाऊन काळात दारू चा काळाबाजार करणाऱ्या बार चालकांना मनसेचा दणका….

185

दारू साठ्यात मोठी तफावत..

मनसेच्या तक्रारी नंतर

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते चौकशी चे आदेश…

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ शहरातील दारव्हा रोड वरील दारू दुकान विक्रेत्यांनी लॉक डाउन च्या काळात मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात अत्यंत चढ्या भावाने म्हणजे चौपट दराने दारू विक्री केली.यामुळे त्यांच्या कडील बहुतांश साठा संपला आहे.हा सर्व काळ बाजार लपविण्यासाठी दारू दुकान विक्रेत्यांनी प्रशासनाकडे पार्सल सुविधेची अथवा ऑनलाइन दारू विक्रीची परवानगी मागितली आहे,जेणे करून त्यांना गर्दीचे कारण पुढे करून पार्सल च्या नावावर आपला साठा खोट्या स्वरूपात कागदोपत्री दाखविता येईल.हा सर्व प्रकार दारू बंदी विभागाच्या आशीर्वादाने झाला आहे.अन्यथा हे सर्व शक्य नाही.अश्या स्वरूपाची तक्रार मनसेचे अनिल हमदापुरे आणि देवा शिवरामवार यांनी जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती.संबंधित तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ दारूबंदी विभागाला चौकशीचे आदेश दिले.
त्या अनुषंगाने तब्बल दारव्हा रोड वरील सर्व दारू दुकानांची कसून ८/८ तास चौकशी करण्यात आली.त्यात प्रत्येक बार ची स्टॉक नोंद वही तसेच त्यांचा साठा तपासण्यात आला.या तपासणी दरम्यान या सर्व बार मालकांचा भोंगळ कारभार उघडकीस येणार आहे.मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या चौकशी दरम्यान इनकॅमेरा चौकशी ची मागणी दारूबंदी विभागाकडे केली होती. या तक्रारी मुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून शहरातील काही ठिकाणी चौकशीत जर एवढी मोठी तफावत असेल तर जिल्ह्याचा विचार न केलेलाच बरा.या तक्रारी च्या माध्यमातून शहरातील मोठ्या आणि नामांकित बार मालक लॉक डाउन काळात अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी साहेब काय कार्यवाही करतात याकडे मनसेची पुढील भूमिका ठरणार आहे.मनसेने दोषी दारू दुकानांचे, बारचे परवाना रद्द करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती.या तपासा संदर्भात मनसेचे अनिल हमदापुरे आणि देवा शिवरामवार दारूबंदी विभागाचे प्रमुख मनपिया साहेब यांच्याशी संपर्क केला असता या तक्रारीत तथ्य असून यामध्ये जो तपासणी अहवाल आला आहे तो आज जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना सादर करणार असून त्या नंतर यांच्यावर कार्यवाही ची दिशा ठरेल असे मत व्यक्त केले. मनसेच्या या भूमिकेचे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले असून भविष्यात दारूचा काळाबाजार करण्यावर मनसेच्या या तक्रारी मुळे वचक बसेल असे मत जनसामान्यांनी मनसेकडे व्यक्त केल्याची माहिती मनसेचे अनिल हमदापुरे , देवा शिवरामवार यांनी व्यक्त केले. मनसेने या तक्रारीवर प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्या भूमिकेमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त करत दोषी बार मालकांवर कडक कार्यवाहीची मागणी करत दोषींचा परवाना कायम स्वरूपी रद्द करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.