Home मराठवाडा धक्कादायक बातमी- नांदेड मधून पळालेले ते कोरोना बाधित रुग्ण चंद्रपूर मध्ये सापडले

धक्कादायक बातमी- नांदेड मधून पळालेले ते कोरोना बाधित रुग्ण चंद्रपूर मध्ये सापडले

602

नांदेड , दि.७ ( राजेश भांगे ) – नांदेड शहरातून पळालेले चार कोरोनाग्रस्त रुग्ण चंद्रपूरमध्ये सापडले आहेत.या रुग्णांनी तपासणी वेळी नाव, फोन नंबर, सगळेच खोटे दिल्याने शोधाशोध करताना पोलिसांची दमछाक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, प्रवासात या रुग्णांनी किती लोकांना संक्रमित केले? या प्रश्नामुळे सर्वांची डोकेदुखी वाढली आहे.

1 मे 2020 रोजी 20 कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढी नंतर त्यातील 4 रुग्ण गायब झाले होते.

पण ते सापडत नव्हते. प्राप्त माहितीनुसार त्यापैकी तिघांना चंद्र्पुर पोलिसांनी पकडले आहे. त्यांना तेथून आणण्यासाठी नांदेड पोलिसांचे पथक चंद्रपूरला पोहोचले आहे.

1 मे रोजीच्या कोरोना बाधीत अहवालांमध्ये 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यासर्वाना एका इमारतीत क्वारंटाईन करण्यात आलॆ होते. तेथून 4 रुग्ण गुपचूप पळून गेले होते. त्यांनी प्रशासनाला आपली नावे खोटी सांगितली होती. सोबतच त्यांनी दिलेला मोबाईल नंबर दुसऱ्याचाच होता. त्यांचा शोध अवघड झालेला होता. पळून गेलेल्या 4 जणांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांचा शोध सुरू झाला. पण दैव बलवत्तर म्हणतात ना असेच काही घडले. पळालेले 3 कोरोना रुग्ण चंद्रपूर पोलिसांनी पकडले. त्यांनी नांदेड जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली. नांदेड प्रशासनाने त्या 3 जणांना नांदेडला आणण्यासाठी आपले पथक पाठवले आहे.

इकडे नांदेड प्रशासनाने सुद्धा चौथा कोरोना रुग्ण ताब्यात घेतलेला आहे. पण सांगत असलेले नाव आणि प्रशासनांकडे नाव यात काहीसा फरक आहे. त्याची जुळवा जुळव करण्याचा प्रयत्न सुरु आहे दरम्यान नांदेड ते चंद्रपूर हे अंतर 224 किलोमीटर असताना आणि हा गंभीर प्रकार असताना रस्त्यात असलेल्या तीन जिल्ह्याच्या सीमा वर यांना कोणीच कसे रोखले नाही, हा देखील संशोधनाचा आहे. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. या 7 दिवसाच्या प्रवासात ते किती जणांच्या संपर्कात आले हे शोधणे आता महत्वाचे आहे.