Home विदर्भ साईनाथ जिनिंग अंड प्रेसिंग मध्ये आग.!

साईनाथ जिनिंग अंड प्रेसिंग मध्ये आग.!

261
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

दोन कोटी रुपयांच्या एक हजार कापसाच्या गाठी जळून खाक

सकाळी सात चे सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागली आग.

वर्धा – जिल्ह्यातील सेलू जवळच असलेल्या धानोली जुवाडी येथील साईनाथ जिनिंग-प्रेसिंग मधील कापसाचे गठानि ला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एक हजार गाठी (गठाणी) जळून खाक होऊन जवळपास दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले.
काही दिवसापासून सूर्य आग ओकत असून वातावरण चांगलेच तापले आहे, अशातच पाच दिवस अगोदर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सीसीआयची खरेदी सुद्धा चालू झालेली आहे, सर्व जिनिंग मध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे, आज शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान जुवाडी धानोली येथील साईनाथ जिनिंग-प्रेसिंग येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये हजार कापसाच्या गाठी (गठानी) जळून खाक झाल्याने जिनिंग चे जवळपास दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, ह्या जिनिंग मध्ये सीसीआयची सुद्धा खरेदी आहे परंतु योगायोगाने सीसी आईच्या खरेदी केलेल्या कापसाला तसेच गाठीला कुठलच नुकसान झाले नाही. जिनिंग मधल्या कर्मचाऱ्यांनी अगोदर आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले परंतु आगीने रौद्ररूप धारण करताच अखेर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, गठानि ला लागलेल्या आगीमध्ये अग्निशामक दलाला दुपारी 4 पर्यंत आगीवर नियंत्रण करण्यात यश आले. कृषी उत्पन्न बाजार समिती कडून सुरू करण्यात आलेल्या सीसीआयची खरेदी ला तसेच जिनिंग मधील कापूस खरेदी ला काही दिवस स्थगिती देण्यात आली असून पुढील सूचना प्राप्त होई पर्यंत शेतकऱ्यांनी मार्केट यार्ड मध्ये कापूस गाड्या आणू नये, असे आवाहन सभापती विद्याधर वानखेडे यांनी केले आहे.