Home विदर्भ बॅकेचे नाव मध्यवर्ती भांब , “म्हणते जरा दूरच थांब….!”

बॅकेचे नाव मध्यवर्ती भांब , “म्हणते जरा दूरच थांब….!”

120

देवानंद जाधव

हा संदेश सर्व दुर पेरला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता आता कोरोणा विषाणु सोबत दोन दोन हात करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे जागो जागी दिसत आहे.

यवतमाळ – अदृश्य शञु कोवीड 19चा नायनाट करण्यासाठी, संपुर्ण भारत देश, बंद दाराआड बसला आहे. घरीच राहुन किंबहुना सुरक्षित अंतर राखून कोरोणा वर मात करता येते, असा आशावाद देशातील तमाम जनता बाळगून आहे. गल्ली पासुन दिल्ली पर्यंत शासन आणि प्रशासनाने केलेली जनजागृती, समाजाच्या अंतीम टोकाच्या माणसांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. अगदी ग्रामीण भागातील जनता सुद्धा नियमाचे काटेकोर पणे पालन करताना दिसत आहे. यवतमाळ तालुक्यातील भांब (राजा) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आवारात ग्राहकांकडुन सामाजिक दुरावा ठेऊन देवान घेवान केली जात आहे. शेतकरी, निराधार, कर्मचारी, आणि अन्य खातेदारांची या बॅंक मध्ये दररोज मोठी गर्दी असते. परिसरातील हिवरी, मनपुर, वाटखेड, बेचखेडा, मांगुळ, तरोडा, बेलोरा, वाई, रुई, बोरी (गोसावी) वसंतनगर, रामनगर या सह अन्य गावातील लोकांचे व्यवहार या बॅंके मध्ये होत असतात, बॅंक प्रशासन कुणालाही ञास होणार नाही, याची काळजी घेतांना दिसत आहे.