Home उत्तर महाराष्ट्र ऐतिहासिक पेडगाव येथील भुईकोट किल्ल्यावर शंभुसेना संघटनेच्या वतीने वृक्ष संवर्धन मोहीम….!

ऐतिहासिक पेडगाव येथील भुईकोट किल्ल्यावर शंभुसेना संघटनेच्या वतीने वृक्ष संवर्धन मोहीम….!

114

अ.नगर , दि. ०६ – (प्रतिनिधी) :- उन्हाळ्याची तीव्र दाहकता व सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडावरील (बहादूरगड) वृक्षांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन, शंभुसेना सामाजिक संघटनेच्या वतीने झाडांना पाणी देने, गडाची साफ-सफाई, वृक्षांची मशागत आदी. संर्वधन मोहीम राबविली जात आहे.

शिवपुत्र, स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या तेजस्वी शौर्यचा कणखर बाणेदार इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडावर (बहादूरगड) विविध माध्यमांद्वारे दरवर्षी वृक्षांची लागवड केली जाते व त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो, तरी देखील उन्हाळ्यात सर्व झाडांचे संवर्धन करणे खूपच जिकिरीचे होते, यामुळे सर्व माध्यमे आप-आपल्या परीने संवर्धनाचे प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग म्हणून शंभुसेना सामाजिक संघटनेच्या वतीने ऐन उन्हाळ्यासह लॉकडाऊन काळात मोहिमेतील संबंधित शंभुभक्तांनी संचारबंदीत सुरक्षित अंतर ठेवून वृक्ष संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला.

पेडगाव किल्ल्यावरील वृक्ष संवर्धन मोहिमे प्रसंगी गडाची साफ-सफाई, झाडांभोवतालचे गवत काढुन झाडांच्या बुंध्याची मशागत करत झाडाला मुबलक पाणी घालुन वृक्ष संवर्धन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यात शंभुसेना संघटना प्रमुख मा. दिपक राजेशिर्के, प्रा. शिवाजी क्षिरसागर सर, लक्ष्मीकांत राजे शिर्के सर, श्यामकुमार काराळे सर, वारकरी हरीभक्त श्री. परशुराम खळदकर, श्री.नवनाथ क्षिरसागर तसेच तेजस काराळे , प्रणव क्षिरसागर आदी सहभागी झाले होते. याप्रसंगी बोलताना दिपक राजेशिर्के यांनी राज्यातील शंभुसेना पदाधिकाऱ्यांना उन्हाळ्यासह लॉकडाऊनची तीव्रता पाहता आपल्या भागातील वृक्षांचे संवर्धन करण्याचे कळकळीचे आवाहन केले व कोणतेही समाजकार्य करत असताना लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे.