Home महत्वाची बातमी अखेर त्या रेशन दुकानाचा परवाना निलंबित , मात्र बेजबाबदार वक्तव्य करणारा आधिकारी...

अखेर त्या रेशन दुकानाचा परवाना निलंबित , मात्र बेजबाबदार वक्तव्य करणारा आधिकारी अभिजित बोरोडेच काय ? {पोलिसवाला ऑनलाइन मीडिया इफेक्ट }

280

मुंबई प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसापासून सोशल मीडियात आणि पोलिसवाला ऑनलाईन मीडिया मध्ये वृत्त प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दणका मालाड पश्चिम रातोडीगाव येथील दुकान नीलिमा को ऑप सोसायटी तील रेशन दुकान क्रमांक 42 ग 194 या दुकानाचा अनागोदी कारभार तक्रार दार सुरेश वाघमारे यांनी उघडकीस आणला आहे या दुकानातून लोकांचे हक्काचे रेशन मिळत नव्हते दुकानदार कार्डधारकांना” लेना हैं तो लो नही तो मत लो आपणा कार्ड दुसरे दुकान मे करो “असे उलटसुलट बोलत असे या पावती न देणे दर्शनी भागात दुकान नामफलक न लावणे ज्या चे पाच व्यक्ती असतील त्याना चारच व्यक्तीचे रेशन देणे मोफत तांदूळ नाकारणे असे प्रकार सदर दुकानदार करत असल्याचा प्रकार सुरेश वाघमारे यांनी कुठल्याही प्रलोभनास बळी न पडता अत्यन्त जगजाहीरपणे उघडकीस आणला तेंव्हा पासून काळाबाजारी करणाऱ्या रेशन दुकानदार व अधिकारी यांचे धाबे दणाणले असून या गंभीर प्रकरणाला दाबण्यासाठी या दुकानावर दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी रेशन उपनियंत्रक सुहास शेवाळे कांदिवली विभाग यांनी निलंबनाची कारवाई केली व गेट क्रमांक 7आझमी नगर दुकान क्रमांक 42ग 297 या ठिकाणी कार्डधारकांना रेशन मिळणार असल्याने रातोडी गाव येथील कार्डधारकांची जाणीवपूर्वक परवड होणार असून आजमी नगर येथील दुकान देऊन जनतेस जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रकार दिसतो या ऐवजी राठोडी गाव नजीक दुकान व्यवस्था करावी जेणे करून लोकांची ये जा करण्यास परवड होणार नाही याची दक्षता रेशन विभागाने घ्यावी असे वाघमारे यांचे म्हणणे आहे दुकानावर कारवाई करून आधिकारी मोकळे झाले हे सत्य आहे मात्र निरीक्षक अभिजित बोरोडेनी सुरेश वाघमारे यांना फ़ोन वरून “तुम्ही तुमचे रेशन जाऊन घ्या आणि केलेली तक्रार माघे घेऊन टाका तेंव्हा वाघमारे साहेब यांनी सष्ट शब्दात सांगीतले हा माझा एकट्याचा प्रश्न नाही तर गरजु व सामान्य जनतेच्या वंचीत लोकांच्या समस्या आहेत तेंव्हा बोरोडेनी अगदी बेजबाबदारपणे केलेलं वक्तव्य तुम्ही तुमचं बघा हो लोकांचं नका सांगू ” अशोभनीय व निषेधार्ह असून अस्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे खरा काळाबाजार चालतो अश्या अधिकाऱ्यास जरब बसने काळाची गरज आहे. करिता सुरेश वाघमारे यांनी शेवटी कोरोनाच्या प्राश्वभूमी मुळे आपल्या घरातच दिनांक 1 मे 2020 रोजी अन्न त्याग आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र लॉकडाऊन मध्ये प्रशासनाची होणारी दमछाक बघता स्थानिक मालवणी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड यांच्या मध्यस्थीने तूर्तास अन्न त्याग आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या बेजबाबदार आधिकारी अभिजित बोरोडेवर प्रशासनाने त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी तक्रादार सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केली आहे या न्यायहक्कांच्या लोकलढ्यात राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे निकटवर्तीय अपंगाचे नेते रामदास खोत व फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप आदींनी पाठपुरावा केला असून मालाड कांदिवली विभागातून रेशन कार्ड धारकांच्या खूप तक्रारी येत आहेत याबद्दल लवकरच मोठे जनांदोलन प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून उभारणार असल्याचे सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळविले आहे.