Home मराठवाडा नांदेड जिल्हा ग्रीन मधुन ऑरेंज झोन मध्ये – तर आणखी तीन कोरोना...

नांदेड जिल्हा ग्रीन मधुन ऑरेंज झोन मध्ये – तर आणखी तीन कोरोना बाधित रुग्ण , एकुण संख्या सहा व दोघांचा मृत्यु

199

नांदेड, दि. ०१ ( राजेश भांगे ) – नांदेड मध्ये आणखी नव्या ३ रुग्णांची संख्या वाढली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नांदेड शहरातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पीर बुर्‍हाण नगर येथे आढळला होता. त्यानंतर कोरोना बधितावर उपचार केल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र त्याला अन्य आजार असल्याने त्यावर उपचार सुरू होते. अन्य आजारावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेलू येथून नांदेड येथे उपचारासाठी आलेल्या पॉझिटिव महिलेचा काल रात्री उशिरा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना रात्री उशिरा नांदेड मध्ये तीन कोरोना बाधित आढळून आले .यात नांदेड जवळील सांगवी, व कंधार तालुक्यातील एक आणि आखाडा बाळापूर हुन उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . नागरिकांनी घाबरून न जाता आपआपल्या घरात राहून सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे .अफवा पसरू नका अफवांवर विश्वास ठेवू नका असेही सांगण्यात आले.

नांदेड जिल्हा ग्रीन मधून ऑरेंज झोन मध्ये

– केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली वर्गवारी

– मार्गदर्शक सूचनेनुसार नांदेड जिल्हा (ग्रामीण) ग्रीन झोनमध्ये तर नांदेड महानगरपालिका क्षेत्र ऑरेंज झोनमध्ये

– औरंगाबादला रेड झोन तर उस्मानाबादला ग्रीन झोन

– मराठवाड्यातील इतर ६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये

* महाराष्ट्रात
+ रेड झोन : १४ जिल्हे
+ ऑरेंज झोन: १६ जिल्हे
– ग्रीन झोन: ६ जिल्हे (उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा)

* देशात
+ रेड झोन: १३० जिल्हे
+ ऑरेंज झोन: २८४ जिल्हे
– ग्रीन झोन: ३१९ जिल्हे
(मागील २१ दिवसात एकही नवीन रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले जातात.)

*कोरोना_अपडेट_हिंगोली -:*

– हिंगोलीत आणखी एसआरपीएफचे २५ जवान कोरोना पॉझिटिव्ह

– हिंगोलीत कोरोना बाधितांची एकूण संख्या ४५ वर.