Home मुंबई ५५ व त्यापेक्षा अधीक वयाच्या पोलिसांना घरी राहण्याचे आदेश

५५ व त्यापेक्षा अधीक वयाच्या पोलिसांना घरी राहण्याचे आदेश

179

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

कोरोना संकटात तीन पोलिसांना वीर मरण आल्यानंतर ५५ वर्षीय व त्यापेक्षा जास्त वयाच्या पोलिसांनी कर्तव्यावर हजर न राहण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जाहीर केला आहे. पोलिसांच्या अनुपस्थिती कालावधीत अर्जित रजा म्हणून गणण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस व पोलीस कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनाची लागण झाल्यावर ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होताे, हे आता पर्यंतच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. सदर बाब लक्षात घेऊन मुंबई पोलस आयुक्त परमबीर सिंग यांनी तात्काळ आदेश जारी करून ५५ वर्षीय व त्यापेक्षा जास्त वयोगटातील पोलिसांना घरी राहण्याचे आदेश दिले आहेत.
खरं पाहता ५० वर्षीय वयोगटापासून सर्वच पोलिसांना घरी बसण्याचे आदेश हवे होते. उशिरा का होईना मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो निर्णय घेतला तो उत्तमच म्हणावा लागेल.