Home मराठवाडा देगलूर पोलिसांनी नांदेड जिल्ह्याची सीमा ओलांडून तेलंगणात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ३० युवक...

देगलूर पोलिसांनी नांदेड जिल्ह्याची सीमा ओलांडून तेलंगणात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ३० युवक युवतींना घेतले ताब्यात

118

नांदेड, दि. २८ ( राजेश भांगे ) – लॉकडाऊन मुळे लातुर येथे कृषी कंपनीच्या मार्केटींगचे प्रशिक्षण घेणारे तेलंगणातील ३० तरुण, तरुणी आपल्या घराकडे जाण्यासाठी भर उन्हात आडमार्गे पायी चालत, मिळेल त्या वाहनाने सिमावर्ती भागात मदनूर चेक पोस्ट जवळ आल्याचे माहिती वरून देगलूर पोलीसानी शनिवारी ताब्यात घेऊन मुक्रमाबाद पोलीसांच्या ताब्यात दिले.यानंतर मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी या तरुणांना आयशर टेम्पोने परत पोलीस संरक्षणात लातुर येथे पाठवून तेथील प्रशासनाला कळविण्यात आले आहे.सध्या राज्यात कोरोणा महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रशासना पुढे एक भयावह संकट उभे राहिले आहे.या संकटाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन सुरु केल्यामुळे वैद्यकीय विभाग व पोलीस प्रशासना सह आदी विभागाकडून शर्तीचे प्रयत्न करीत असून तर संचार बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे पोलीस करीत आहेत.पण नागरीकांना त्याचे काही सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसुन येत आहे. गेल्या कांही महिन्यापासून तेलगांणातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात तरुण,तरुणी लातुर येथे कृषी कंपनीच्या मार्केटींगचे प्रशिक्षण घेत आहेत.
पण कोरोणा महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सर्व शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित विभाग कांही कालावधीसाठी राज्य शासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेले व लातुर येथे प्रशिक्षण घेणारे ३० तरुण, तरुणी आपले गाव गाठण्यासाठी भर उन्हात आडमार्गे पायी चालत निघाले होते शनिवारी हे तरुण देगलुर पासून जवळच तेलंगणा सिमावर्ती भागातील मदनुर चेक पोस्टवर आले असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून देगलुर पोलीसानी त्याठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन मुक्रमाबाद पोलीसाच्या स्वाधीन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी चौकशी करुण या तरुणांना एका वाहनातून पोलीस संरक्षणात लातुर येथे पाठवून देण्यात आले. लॉकडाऊन मुळे आता आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आमची उपासमार होत आहे.तरी प्रशासनाने आमची राहण्याची व जेवण्याची सोय करा नसता आम्हाला तेलंगणात जाण्याची परवानगी द्यावे, असे प्रशिक्षण घेणारे तरुणांनी बोलताने म्हणाले.