Home मराठवाडा देगलूर प्रशासनाची धडक कारवाई सुरूच, २५ जणांवर केली दंडात्मक कारवाही

देगलूर प्रशासनाची धडक कारवाई सुरूच, २५ जणांवर केली दंडात्मक कारवाही

128

राजेश भांगे

नांदेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देगलूर प्रशासनाने आजही धडक मोहीम राबवून मास्क न लावणे, विनाकारण घराबाहेर पडणे, रस्त्यावर थुंकणे व जीवनावश्यक नसलेले वस्तूंची दुकाने चालू ठेवणे या कारणास्तव शहरातील २५ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ४२०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत.

सूर्यकांत देशमुख, खाजा अहमद साब, बाबू वसंत, संदीप टेकले, ग्यनोबा कदम, बाबुराव चव्हाण, हनुमंत मलापुरे, सचिन स्वामी, सूर्यवंशी सिद्धार्थ, शिवाजी गुंडुरे, संजय फुलारी, संतोष विश्वकर्मा, अशोक सायलू , अहमद सुगाव, नसरुद्दीन, विलास देशमुख , बालाजी पांचाळ, रेवण मठवाले, अजहर शेख, मोहम्मद समीर , शेख फेरोज, चंद्रकांत आनंदराव, आरिफ मस्तान, विलास कोयलावार, रामेश्वर कावटवार या २५ व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करून त्यांचेकडून ४२०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहे.
तरी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, तहसीलदार अरविंद बोळन्गे, मुख्याधिकारी जी.एम. इरलोड, स.पो.नि.संगमनाथ परगेवार , स्वच्छता निरीक्षक मारुतीराव गायकवाड,न.पा. कर्मचारी मार्तंड वनन्जे, संघरत्न ढवळे, रवी कांबळे, सिद्धार्थ वाघमारे, लक्ष्मण कांबळे, सूर्यप्रकाश फासगले व सफाई कामगार यांनी शहरातील विविध भागात बाजार पेठेत फिरून व चौकामध्ये थांबून नियम तोडणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई केली. ही मोहीम दररोज चालूच राहणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन देगलूर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .