Home मराठवाडा कोरोना व्हायरच्या विषाणू संसर्गाबाबत जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती

कोरोना व्हायरच्या विषाणू संसर्गाबाबत जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती

66
0

नांदेड , दि. १७ ( राजेश भांगे ) – जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून ही (दि.१६)नांदेड जिल्ह्यातील दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या ५५६ आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली १६९ असून सध्या निरीक्षणाखाली असलेले ६० नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये ३९ नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले ५१७ अशी संख्या आहे.

आज तपासणीसाठी २२ नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण २९६ नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी २२६ नमुने निगेटीव्ह आले असून ६५ नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच ५ नमुने नाकारण्यात आली आहेत.

जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी ७४ हजार ३२६ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. यामध्ये कंधार तालुक्यात- ९४८१, किनवट- २५२६, देगलूर- ७१९५, धर्माबाद- १५०५, बिलोली- ४४१३, लोहा- ४९६३, उमरी- १९३८, हदगाव- ५९८२, भोकर- २२२०, मुखेड- ११६३७, मुदखेड- १७८०, अर्धापूर- २३५६, माहूर-३४३७, हिमायतनगर- १९७९, नायगाव- ६३८३, नांदेड तालुका- २४४२ तर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड- ४०८९ यानुसार जिल्ह्यात एकुण प्रवासी संख्या ७४ हजार ३२६ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.