Home मराठवाडा देगलूरा पोलिस निरिक्षकांनी लाॕकडावुन दरम्यान नियमाचे उल्लंघन करून (बाहेरून) येणाऱ्यास दिला सज्जड...

देगलूरा पोलिस निरिक्षकांनी लाॕकडावुन दरम्यान नियमाचे उल्लंघन करून (बाहेरून) येणाऱ्यास दिला सज्जड इशारा

634

नांदेड, दि. १७ ( राजेश भांगे ) – पोलीस स्टेशन देगलूर जी.नांदेड़ हद्दितिल सर्व नागरिकांना (विनंती) कळविण्यात येते की, कोविड १९ कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढाईत सर्वांनी सहकार्य करावे.
व आपले नातेवाईक बाहेरिल जिल्ह्यात किंवा राज्यात लॉकडावुन दरम्यान अड़कुन पडलेले असतील तर त्यांना ते ज्या ठिकाणी आहेत तेथेच थांबण्याचा आग्रह करावा कारण त्यांच्या आगमना मुळे दुर्दैवाने आपल्या कुटुंबाच्या व परिसरातील लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.
तरी पोलीस स्टेशन च्या हाद्दितील कोणाच्या ही घरी बाहेरिल जिल्ह्यातून किंवा पराराज्यातून त्यांचे नातेवाईक lock down च्या कालावधित चोरुन लपुन किंवा आडरानातून घरीआल्याचे निदर्शनास आल्यास आणि त्यांच्या पासून समाजास धोका उदभवल्यास संबंधित कुटुंबातील लोकांवर व संबंधित व्यक्तीला अपप्रेरना देणाऱ्या व्यक्तिं विरुद्ध गंभीर स्वरूपाची विविध कायद्याच्या कलमाखाली कठोर कारवाही करण्यात येईल याची सर्व जनतेने नोंद घ्यावी असा सज्जड इशाराच पोलिस निरिक्षक भगवान एम धबडगे पोलिस स्टेशन देगलूर, यांनी पोलिसवाला आॕनलाईन मिडियाच्या माध्यमातुन नागरिकांना यांनी दिला आहे.