Home विदर्भ लॉकडाऊन मध्ये गोवंश कत्तलीवर हिवरखेड पोलिसांनी मारला छापा

लॉकडाऊन मध्ये गोवंश कत्तलीवर हिवरखेड पोलिसांनी मारला छापा

452

देवानंद खिरकर – अकोट

अकोला – आज पोलिस चौकी येथे हजर असतांना गोपनीय माहीती मिळाल्या वरुन अब्दुल शाहरख अब्दुल शहीद राहणार अडगाव बु हा त्याच्या राहत्या घराच्या बाजूला त्यांच्या नविन बांधकाम करीत असलेल्या घरात गोवंशाची कत्तल करुन मासाची विक्री करीत असलेल्या बाबतची माहीती मिळाली सदरची माहीती मा.ठाणेदार यांना फ़ोन द्वारे देवुन व त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही पंचनाम्यातील नमुद दोन पंचाना पोलिस चौकी अडगा बु येथे बोलावून त्यांना बातमीची माहीती दिली व पंच म्हणून सोबत पो उप निरिक्षक विठ्ठल वाणी,पो का निलेश खंडारे,व पंच असे मीळालेल्या बातमी प्रमाणे शिवाजी नगर झोपडपट्टी मधे राहणार्या अब्दुल शाहरुख अब्दुल शहीद यांचे घरी गेलो असता त्यांचे राहते घराचे दक्षीणेस चालू असलेल्या त्यांचे नविन बांधकाम करीत असलेल्या त्यांचे नविन बांधकाम करीत असलेल्या घरी गेलो असता सदर घराचे अर्धवट बांधकाम सुरु असुन सदर बांधकाम चालू असलेल्या घरामधे एक इसंम मिळुन आला त्यास पंचासमक्ष नाव गाव विचारले असता त्याने अब्दुल शाहरूख अब्दुल शहीद वय 22 वर्ष राहणार शिवाजी नगर झोपडपट्टी अडगाव बु असे सांगितले सदर घरामधे पंचासमक्ष पाहणी केली असता घरात गोवंश मासाचे तुकडे,पायाची खुरे,आतडे,चामडी नसलेले मुंडके,व लाल रंगाची गोवंशाची चामडी असे एकुण 60 किलो गोवंश मासाचे कत्तल केलेले तुकडे किंमत 12000 हजार रुपये व दोन लोखंडी सूर्या किंमत 1000 रुपये 13000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल आहे व आरोपी विरुध्द कलम 429,34 भादवी सहकलम 5,5 (क)9,9(अ) महा.प्रा.सं.अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पांडूरंग राऊत,निलेश खंडारे यांनी केली.