मराठवाडा

कंधार तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कडील कापूस नांदेड, नायगाव येथील कापूस संकलन केंद्रावर विक्रीसाठी न्यावा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Advertisements

नांदेड , दि. ११ ( राजेश भांगे ) – कोरोनाशी निगडित विविध विषयांवर तसेच अन्नधान्य वितरणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधला.
याच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कंधार तालुक्यांसह इतर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादीत कापूस विक्रीसाठी येत असलेल्या अडचणीबाबत सविस्तर सूचना दिल्या.
कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी नांदेड अथवा नायगाव येथील कापूस संकलन केंद्रावर विक्रीसाठी न्यावा असे सांगितले. शेतकऱ्यांनी दर्जेदार कापुसच (एफ ए क्यू) विक्रीसाठी आणावा असे आवाहन केले. कापूस खरेदी केंद्रांना गठाण वाहतूक, सरकी वाहतूक या व इतर अनुषंगिक बाबीसाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल. कापूस खरेदीसाठी संकलन केंद्रानी इतर कुठलीही सबब पुढे करु नये अशा सूचनाही दिल्या.
खरीप हंगामातील बहुतांश कापसाची विक्री झाली असून फार तुरळक प्रमाणात वेचणीसाठी व साठवलेला कापूस शिल्लक असून यातील दर्जेदार कापूस संबंधित संकलन केंद्रावर विक्रीसाठी न्यावा.
या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कंधारचे उपविभागीयअधिकारी पांडुरंग बोरगावकर, कंधार तहसिलदार सखाराम मांडवगडे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सहाय्यक निबंधक जी आर कौरवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव पी. डी. वंजे यांच्यासह नायब तहसीलदार विजय चव्हाण, ताडेवाड यांची उपस्थिती होती, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी कंधार यांच्याकडून देण्यात आली आहे.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...