राष्ट्रीय

चोराला पकडला, वैद्यकीय चाचणीत कोरोना झाल्याचं उघड, १७ पोलीस, न्यायाधीश, कोर्ट कर्मचारी क्वारंटाईन

Advertisements

विषेश प्रतिनिधी – राजेश भांगे

चंदीगड – देशभरात कोरोनाने कहर माजवला असताना, तिकडे पंजाबमध्ये अजब घटना ( policemen quarantine after thief coronavirus Positive ) समोर आली आहे. पोलिसांनी पकडलेल्या एका चोरट्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, त्याला पकडणाऱ्या आणि संपर्कात आलेल्या तब्बल १७ पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (policemen quarantine after thief coronavirus Positive). इतकंच नाही तर त्याला कोर्टात हजर केल्याने, न्यायाधीश आणि कोर्ट कर्मचाऱ्यांनाही स्वविलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चोरट्याचा साथीदार पळून गेल्याने त्याची प्रकृती काय आहे आणि तो कुणा कुणाच्या संपर्कात आला आहे, असे गंभीर प्रश्न पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर आहेत.

You may also like

राष्ट्रीय

डिजीटल मिडिया च्या माध्यमातून वृत्त व चालू घडामोडींचे अपलोडिंग , प्रसारण करणाऱ्यांसाठी सुविधा आणि लाभ…!

नवी दिल्‍ली , दि. १६ :- उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) ला केंद्र ...
राष्ट्रीय

अयोध्येमधील राममंदिराचे भूमिपूजन ३ किंवा ५ ऑगस्टला , “पंतप्रधान मोदींच्या हस्ते समारंभ”

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे अयोध्या दि. १९ – अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचे भूमिपूजन ३ ...