Home विदर्भ बरांज तांडा येथील हात भट्टी वर भद्रावती पोलिसांची धाड 10 लाख 66...

बरांज तांडा येथील हात भट्टी वर भद्रावती पोलिसांची धाड 10 लाख 66 हजार रुपयांचा माल जप्त…!

64
0

चंद्रपूर प्रतिनिधी – मनोज गोरे

संपूर्ण जगभरातच नव्हे तर देशात कोरणा संक्रमणाचा कहर सुरू असताना देशभरात संचारबंदी लावण्यात आली आहे.

मात्र तालुक्यातील बरांज तांडा येथे सर्रास अवैध दारू हातभट्टीची दारू गाळण्याची प्रक्रिया सुरू असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच धाड घालून 10 लाख 66 लाख रुपयांचा माल जप्त करण्याची कारवाई दिनांक 7 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी केली .यातील आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.
पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांची गस्त सुरू असताना बरांज तांडा ते बोनथला रस्त्यावरील वीट भट्टीचे मागे झुडपी जंगलात हात भट्टी लावून गूळ सडव्याची दारू काढत असून कच्चा माल ड्रममध्ये जमिनीत पुरवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सुनील सिंह पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष तुलजेवार, पोलीस उपनिरीक्षक ठाकूर व सहकाऱ्यांनी धाड घातली असता त्याठिकाणी 26 मोठे प्लास्टिक ड्रम 5200 लिटर गुढीपाडवा गुळ सड़वा याची किंमत दहा लाख 40 हजार रुपये व 26 ड्रम किंमत 26 हजार असे एकूण 10 लाख 66 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी गुड सडव्याचे नमुने घेऊन सडवा व प्लास्टिक ड्रम जाळून नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपी वर कलम 65 (फ़)अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.