महत्वाची बातमी

पालकमंत्री ना ,डॉ , राजेंद्र शिंगणे यांनी घेतला चिखलीतिल कोरोना परिस्थितीचा आढावा,

Advertisements

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश

अमीन शाह

बुलडाणा

बुलढाणा देशभर हैदोस घालणाऱ्या कोरोनाने बुलढाणा जिल्ह्यात देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 6 तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. बुलढाणा आणि चिखली शहरात तर रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी आज चिखली येथे अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना अनेक महत्वपूर्ण सूचना देखील केल्या.

बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले असून यामध्ये चिखलीतील तिघांचा समावेश आहे. त्यामुळे चिखली शहराकडे कोरोना हॉटस्पॉट म्हणून बघितल्या जात आहे. याचीच दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी चिखलीतील महसूल, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, नगर परिषद व पोलीस प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायकाय उपाययोजना करण्यात येत आहे याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे जे ग्राऊंडलेवलला काम करत आहे अशा आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांचे सुरक्षिततेबाबत नेमकी काय काळजी घेण्यात येते, याबाबतची आवर्जून विचारणा केली. काम करत असतांना अधिकाऱ्यांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी त्या देखील मनमोकळेपणाने सांगाव्या अशा सूचना केल्या. संचारबंदीच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणारा लहान असो की मोठा त्यावर कडक कारवाही करावी असे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहे.* चिखली शहरातील परिस्थिती हाताळत असतांना येथील *निर्णय घेण्याचे अधिकार नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले.ग्रामीण भागात नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहे याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना शेतीचे काम करतांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी महत्वपूर्ण सूचना देखील पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना केली.

You may also like

विदर्भ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पी पी ई किट….मनसे समाजातील सरसावली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...