Home महत्वाची बातमी अमरावती जिल्हातील विटाळा येथील अवैद्य धंद्यांचा भंडाफोड

अमरावती जिल्हातील विटाळा येथील अवैद्य धंद्यांचा भंडाफोड

82
0

अमरावती ग्रामिण पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने संयुक्त कारवाईला यश

बाबाराव इंगोले

झाडगांव / धामणगांव – धामणगांव रेल्वे तालुक्यातील विटाळा गांवात अनेक दिवसा पासून अवैद्य धंदे जोमात सुरू असल्याची माहीती मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनला दिली होती.

पंरतू मंगरुळ पोलीसांचे विशेषत:ह्या परीसरातील बिट जमादार व सहकारी पोलीसांचे अवैद्य धंदेवाल्यांशी साटेलोटे असल्याने जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतल्याने पोलीसवाला ऑनलाइन मिडिया या दि.४ एप्रिला “धामणगांव रेल्वे तालुक्यातील विटाळा गावातील अवैद्य धंद्याला अभय कुणाचे?” ह्या सदरा खाली बातमी प्रसिध्द केली होती.

ह्या बातमीच्या दणक्याने जिल्ह्यातील पोलीस यंञणा जागृत होवून गांवात संयुक्त पणे कारवाई करुन अवैद्य धंद़्याचा भंडाफोड केला.
अमरावती ग्रामिणचे पोलीस अधिक्षक यांनी बातमीची दखल घेवून संबंधीत पोलीस स्टेशनला सक्त कारवाईच्या आदेशाने तळेगांव दशासर व दत्तापुर पोलीस पोलीस स्टेशनचे दोन अतिरीक्त कर्मचारी यांना घेवून व त्यांना गांवातील जबाबदार पदाधिकारी सरपंच मंगेश ठाकरे,उपसरपंच नितीन वाघाडे,पोलीस पाटील,माजी उपसरपंच देविदास पन्नासे,माजी ग्रा.पं.सदस्य,तथा तंटा मुक्तीचे अध्यक्ष हिरामण डाहे,माजी सरपंच राजूभाऊ बाभुळकर , सामाजिक कार्यकर्ते सहकारी यांच्या प्रयत्नाने मंगरुळ दस्तगीर येथील ठाणेदार वानखडे व राज्य उत्पादक शुल्क विभाग यांचे संयुक्त विद्यमाने वर्धा नदी जवळील परीसरात शोध मोहिम करुन मोठ्या प्रमाणात असलेले गावठी दारुचे अड्डे उध्वस्त केले.ह्या कार्यवाहीत तीस ड्राम व अंदाजे १.५०लक्ष रुपयाचा मालसाठा पकडण्यात आला असला तरी माञ परीसरातील बिट जमादार व सह कर्मचारी यांना वेळोवेळी गांवातील जबाबदार पदाधिकारी सरपंच मंगेश ठाकरे,उपसरपंच नितीन वाघाडे तंटामुक्ती अध्यक्ष हिरामण डाहे,माजी उपसरपंच देविदास पन्नासे,सरपंच राजूभाऊ बाभूळकर व ग्रा.पंचायत सदस्य यांनी अवैद्य धंद्धे करणाऱ्यांची माहिती देवून सुद्धा अवैद्य धंद्धे वाल्यांना पुर्व माहिती देवून माहिती देणाऱ्यास खोटी माहिती असल्याचे जाणिव पुर्वक पुर्वी भासविल्या जात होते.त्यामुळे अवैद्य धंद्धेवाल्याचे परीसरातील कार्यरत असलेल्या संबंधीतांशी लांगेबांदे असल्याची परीसरातील पदाधिकऱ्यांत चर्चेला उत आला आहे.ह्या ठोस कारवाईने अवैद्य धंद्धेवाल्यांचे धाबे दणांनले असतांना त्यांचे वर काय कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.