Home महत्वाची बातमी वाघाच्या हल्यात महिला ठार , सातारा येथील शेत शिवारातील चिमूर घटना

वाघाच्या हल्यात महिला ठार , सातारा येथील शेत शिवारातील चिमूर घटना

49
0

चंद्रपूर- मनोज गोरे

यमूनाबाई व पती पांडूरंग सोनबा गायकवाड दोघेही स्वतःच्या शेतात नेहमी प्रमाणे मोहफुल जमा करायला पहाटेच गेले. मोहफुल वेचत असताना वाघाने यमुनाबाईवर हल्ला केला.

तिच्या ओरडण्याने हि बाब पांडूरंगला लक्षात आली. वाघाशी दोन हात करत त्यानी पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यशस्वि होऊ शकले नाही व वाघाने तिला ठार केले. हि घटना स्वताच्या शेतातील संरक्षीत वन गट क्रमांक १४३ / ७ मध्ये बुधवारला पावणे सात वाजता पहाटे घडली. वाघाच्या हल्ल्यात मृतक व्यक्तीचे नाव यमनुबाई पांडूरंग गायकवाड वय ५७ वर्ष सातारा येथील रहिवासी आहे.
खडसंगी वन परीक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सातारा गावालगत काही अंतरावर संरक्षीत वन गट क्रमांक १४३ / ७ व शेत सरवे न १४७ मध्ये पांडूरंग सोनबा गायकवाड यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात मोहफुलांची झाडे फुलाने बहरलेली आहेत.ते वेचण्या करीता बुधवार ला पहाटेच यमुनाबाई पती पांडूरंग सोबत गेली होती.दोघेही वेगवेगळ्या बाजुला काही अंतरावर मोहफुल वेचत असताना गावाकडुन येनाऱ्या रस्त्याने ६ .४५ च्या दरम्यान वाघाने यमूनाबाईवर हल्ला चढविला.हे यमूनाबाईच्या झटापटीच्या आवाजाने व वाघाच्या आवाजाने पती पांडुरंग ला लक्षात आले. पत्नीला वाचविण्या करीता दगड काठीने दोन हात करत हाकल्याचा प्रयत्न केला व मदती करीता आरडा ओरड केली. मात्र या दरम्यान वाघाने यमूना बाईला ठार करूण अर्धा किलोमिटर ओढुण फरकट जंगला कडे नेले.
काही क्षणातच पांडूरंगाच्या ओरडण्याने शेताला लागुन असलेले शेतकरी व गावाकडील नागरीक धावुन आले ज्यामूळे वाघ पडून गेला. घटनेची माहीती वन विभाग व पोलीसांना देण्यात आली. घटना स्थळी खडसंगी वन परीक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे,वनक्षेत्र अधिकारी आर .जी .कोडापे,ताडोबा वन परीक्षेत्र आधकारी एन .डी शेन्डे,एसीएफ ताडोबा खोरे यांनी घटना स्थळावर पोहचून घटनेचा पंचणामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतकाला उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वाघाचा बंदोबस्त करन्याची मागणी परीसरातील शेतकरी व गावकऱ्यांकडून होत आहे .