Home विदर्भ नांदा येथील युवकांकडून गरजूंना मदतीचा हात , “घरोघरी धान्य कीटचे वाटप”

नांदा येथील युवकांकडून गरजूंना मदतीचा हात , “घरोघरी धान्य कीटचे वाटप”

627

पालकमंत्री महोदयाकडे मदतीची हाक

कोरपना – मनोज गोरे

नांदा ग्रामपंचायतची औद्योगिक वसाहत म्हणून जिल्ह्यात ओळख आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वास्तव्यास आहे लाॅकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत हाताला काम नसल्याने घर चालविणे कठीण झाले आहे अशातच अनेकांकडे रेशनकार्डही नाही ही बाब ग्रामपंचायत सदस्याने ओळखून युवक मित्रांच्या मदतीने नियोजन करून नांदा गावातील जवळपास गरजु शंभर कुटुंबांची निवड केली आहे गहु , तांदुळ , तुरदाळ , साखर , पोहे , रवा, चहापत्ती , तेल , मीठ , मिर्च हळद पावडर व कांदे या साहित्याचे धान्य किट तयार केले आहे निवड केलेल्या गरजु कुटुंबांना साहित्य घर पोहचता करुन दिले जात आहे अडचणीचे काळात युवकांकडून गोरगरिब निराधार कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे नांदा ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोग निधीतुन अशाच पद्धतीचे धान्याचे किट तयार करून लवकरच गावातील अपंग व्यक्तीला साहित्य वाटप करणार असल्याची माहीती ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत यांनी दिली सरपंच गणेश पेन्दोर व ग्राम विकास अधिकारी पंढरीनाथ गेडाम यांनी अपंग व्यक्ती करीता घेतलेल्या निर्णयाचे गावकर्‍यांनी स्वागत केले आहे जवळपास ५२ अपंग लाभार्थी असुन नविन अपंग लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात येणार आहे
नांदा , बिबि , आवारपुर औद्यागिक परिसरातील गावे असल्याने कामानिमित्त जवळपास १५०० कुटुंब बाहेरुन येऊन वास्तव्यास असुन कंत्राटपध्दतीने काम करतात यांचेकडे रेशनकार्ड नाही अनेकांना शासन धान्य देणार याकरिता नावे नोंदवित आहे या कुटुंबांना धान्याची नितांत गरज आहे पालकमंत्री महोदयांनी या कुटुंबांना धान्य किट उपलब्ध करुन दिल्यास आम्ही त्यांचे ऋणी राहू

अभय मुनोत
सदस्य ग्रामपंचायत , नांदा