Home मराठवाडा आ. केराम यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील पाच प्रा.आ.केंद्रांना नवीन रूग्णवाहीका..

आ. केराम यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील पाच प्रा.आ.केंद्रांना नवीन रूग्णवाहीका..

45
0

शासनाकडून ३२ लाखांचा निधी मंजूर..”

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०५ :- ग्रामीण भागातील प्रा.आ.केंद्रातील रूग्णवाहीकांचा जटील प्रश्न अखेर निकाली निघाला असून आ. केराम यांच्या प्रयत्नातून किनवट व माहूर तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रूग्णवाहीकांसाठी ३२ लक्ष रूपयाच्या निधीची तरतूद झाल्याने सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
माहूर व किनवट तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध रूग्णवाहीकांची वास्तविक परिस्थिती भंगार व अतिगंभीर असल्याच्या पार्श्वभुमिवर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नविन रूग्णवाहीका खरेदीसाठी निधी मंजूर करून मंजूर निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी लेखी मागणी आमदार भिमरावजी केराम यांनी लावून धरली होती. त्या पार्श्वभुमिवर माहूर तालुक्यातील वाई बाजार, वानोळा व किनवट तालुक्यातील इस्लापूर, बोधडी व उमरी बा. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रूग्णवाहीका खरेदीसाठी ६.५७४ लक्ष याप्रमाणे एकूण पाच ठिकाणच्या नवीन रूग्णवाहीका खरेदीसाठी ३२.८७ लक्ष रूपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली असून आदिवासी उपयोजनेअंतर्गत सदरचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामुळे माहूर तालुक्यातील वाई बाजारसह वानोळा व किनवट तालुक्यातील उमरी बा., बोधडी व इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रूग्णवाहीकांचा प्रश्न निकाली निघाला असून वरील सर्व ठिकाणी नवीन रूग्णवाहीका उपलब्ध होणार असल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.