Home जळगाव निंभोरा पोलिसांना आ.शिरीष चौधरींकडून मास्क वाटप

निंभोरा पोलिसांना आ.शिरीष चौधरींकडून मास्क वाटप

156

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी तोंडावर लावण्यासाठी कापडी मास्क उपलब्ध करून दिले.या आधी त्यांनी रावेरसह इतर ठिकाणी ही पोलीस तसेच महसूल प्रशासनाला मार्क वाटप केले होते.दरम्यान निंभोरा येथे मास्क वाटप करतांना सपोनि महेश जानकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आ.शिरीष चौधरी यांच्या अनुपस्थितीत निंभोरा येथील सुनील कोंडे,गुणवंत भंगाळे, रवींद्र भोगे यांनी सदर मास्क निंभोरा पोलिसांना तसेच गावातील खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना उपलब्ध करून दिले.यावेळी सपोनि महेश जानकर यांनी आभार मानले.