Home जळगाव रावेर तालुक्यात प्रथम अंमलबजावणी …

रावेर तालुक्यात प्रथम अंमलबजावणी …

43
0

विवरे बु॥ जि प मुलांच्या शाळेच्या ६६ विद्यार्थ्यांना तांदुळ वाटप…..

रावेर (शरीफ शेख)

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन असल्याने शाळा बंद आहे. त्यामुळे विवरे बु॥ जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेच्या विद्यार्थ्यांना व त्यांचे पालकांना मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत विदयार्थ्यांचे जेवणाचे हाल होवू नये. म्हणून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन अंतर्गत मिळणारी खिचडी ऐवजी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना एक एक करून शाळेत बोलावून तांदुळ व दाळ ची वाटप करण्यात आली. जे पालक आजारी आहे. त्यांचे घरा पर्यंत जावून तांदुळ, दाळ पोहचविण्यात आले. पालकांनी तांदुळ वाटप करतांना गोंधळ, गर्दी होणार नाही याची काळजी घेवून सोशल डिस्टेंशन ठेवण्यात आले. शासन निर्णया नुसार शाळा व्यवस्थापन समितीने तांदुळ, दाळ वाटप केली.
विदयार्थ्यांना तांदुळ वाटप करतांना शाळा व्यवस्थापन समितीचे मा.सरपंच वासुदेव नरवाडे , उपसरपंच रविंद्र वासनकर , बिसन सपकाळे, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते, ग्रा.प. सदस्य भागवत महाजन , मुख्याध्यापक सौ मिना कोल्हे , शिक्षक विजय कोल्हे, सौ मिनाक्षी पाटिल, क्लार्क सुरज नरवाडे, राहूल पाटिल, शिपाई गुलाब भंगाळे या सह पालक , विदयार्थी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting