Home महत्वाची बातमी धक्कादायक….,होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही १६ जणांचा उमरगा ते मुंबई प्रवास

धक्कादायक….,होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही १६ जणांचा उमरगा ते मुंबई प्रवास

187

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई , दि. ०३ – संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात आहे. या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नागरिकांना सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या कारणास्तव सरकारकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत. मात्र, अद्यापही लोकांना त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर, एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के असलेल्या १६ जणांनी चक्क उमरगा ते मुंबई असा प्रवास केला आहे. या १६ जणांमध्ये ३ पुरुष, ४ महिला तर ९ अल्पवयीन मुले आहेत. दरम्यान, वडगाव पोलिसांनी आता या सर्वांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, सरकारकडून वारंवार इतक्या सक्त सूचना केल्या जाऊनही नागरिकांकडून त्याचे गांभीर्याने पालन का होत नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
होम क्वारंटाईनच्या सूचना असतानाही या १६ जणांनी हा प्रवास केला आहे. दरम्यान, आता या सर्वांची तळेगाव येथील जनरल हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय करून त्यांना वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये पोलिस बंदोबस्तात होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे सर्वजण २२ मार्चपासून मुरूमगाव येथे राहत होते. शासकीय रूग्णालयात तपासणी करण्यात आली होती. होम क्वारंटाईनच्या सूचना असतानाही ते मुंबईला निघाले होते. अशा पद्धतीची बेजबाबदार कृती केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतरांनाही त्रासदायक ठरू शकते. दरम्यान, म्हणून या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नाकाबंदी असतानाही या १६ जणांनी तब्बल ४०० किलोमीटरचा हा प्रवास कसा केला असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.