Home मुंबई परकीयां विरोधात सैन्याला बोलावले जाते, स्वकियांविरोधात नाही – शरद पवार

परकीयां विरोधात सैन्याला बोलावले जाते, स्वकियांविरोधात नाही – शरद पवार

63
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २०१८ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाची संख्या ३४१ वर गेली आहे. सैन्य हे परकीयांविरोधात सैन्याला बोलावले जाते, स्वकियांविरोधात नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२ एप्रिल) तिसऱ्यांना राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वार संवाद साधला.
फेसबुक लाईव्हदरम्यान एका व्यक्तीने पवारांना राज्यातील नागरिर लॉकडाऊनचे पालन करत नाही तर सैन्याला बोलावण्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर बोलाना पवार म्हणालेकी, सैन्याला बोलविणे हा शेवटचा पर्यय असून सैन्य हे परकीयांविरोधात सैन्याला बोलावले जाते, स्वकियांविरोधात नाही, असेही ते म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार आवाहन करत आहेत. सैन्य बोलावणे ही अगदी शेवटची वेळ आहे, असे ते म्हणाले.
वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी डॉक्टर, नर्स आणि पोलीस कोरोनाशी लढत आहे. यासर्वांनी आपण त्यांचा सन्मान करून त्यांना सहकार्य केले पाहिजे, अशी विनंतीही पवारांनी केली असेही पवारांनी सांगितले. प्रशासन यंत्रणा, पोलिस यंत्रणा अखंडपणे काम करत आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी आपल्याला घरी राहण्याची विनंती आहे. ज्या सूचना आपल्याला आरोग्य विभागाने दिल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करून या रोगावर आपण मात करू हा विश्वास पवारांनी राज्यातील जनतेला दिला आहे.