Home जळगाव निजामुद्दीन मरकज मध्ये फक्त भुसावळ चे शेख अजीमोद्दीन

निजामुद्दीन मरकज मध्ये फक्त भुसावळ चे शेख अजीमोद्दीन

77
0

एजास शाह ,

जलगाँव: एजाज़ शाह ,मागील दोन दिवसापासून दिल्ली येथील निजामुद्दीन तबलीग जमातीच्या मरकज मध्ये काही लोक आढळून आले म्हणून ही बातमी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत गेली सहाजिकच त्याची चौकशी जळगाव मध्ये सुद्धा होत असल्याने जळगाव जिल्हा मनियार बिरादरी ने स्वतः पुढाकार घेऊन याबाबत तब्लीग जमात जळगावचे प्रमुख मुफ़्ती शब्बीर यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून चौकशी केली असता निजामोद्दीन तब्लीग जमात मध्ये भुसावळ येथील जाम मोहल्ला निवासी शेख अजीमोद्दीन राफियोद्दीन ,वय ७२ हे १२ फेब्रुवारी पासून तेथे गेले असून 13 एप्रिल ला त्यांचा परतीचा प्रवास होता परंतु कोरोना या आजारा चे संसर्ग संदर्भात त्यांना सुद्धा दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये कोरानाटाईम मध्ये ते सध्या आहे.
सदर बाबत त्यांचे चिरंजीव मोहम्मद फ़हीम यांच्याशी सुद्धा फारुख शेख यांनी संपर्क साधला त्यांनी सुद्धा या वृत्तास दुजोरा दिलेला आहे.
अशाप्रकारे जळगाव जिल्ह्यातील फक्त भुसावळ येथील एक साथी या मरकज मध्ये असल्याची माहिती आहे.