Home जळगाव दूसरा कोरोना पॉझिटिव्ह ग्रस्त चे निधन उडाली खळबळ , अतातरी बोध घ्या

दूसरा कोरोना पॉझिटिव्ह ग्रस्त चे निधन उडाली खळबळ , अतातरी बोध घ्या

177

एजास शाह

जळगाव

जळगाव येथील सालार नगर येथील दूसरे कोरोना पोसेटिव वृद्ध याचे 2 एप्रिल दुपारी तीन वाजता निधन झाले व त्याचा दफन विधी जळगाव येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये इस्लामी रितीरिवाजानुसार करण्यात आला.
यावेळी मुस्लिम ईदगाह चे जनरल सेक्रेटरी फारुक शेख, माजी अध्यक्ष करीम सालार, सचिव अनिस शाह, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष जीया बागवान कुल जमातीचे सचिव डॉक्टर जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते इसहाक बागवान यांची तसेच मृत च्या तिघेही मुलांची उपस्थिती होती
हाफिस रेहान यांनी जनाजा नमाज अदा केली त्यांना सात फूट बाय सात फूट असा खोल खड्डा करून त्यांचा दफनविधी करण्यात आला दफनविधीसाठी इसाक बागवान शब्‍बीर पटेल अनिस शाह यांनी कार्य केले.
दफन विधी व जनाजा ची नमाज ही संपूर्णपणे योग्य ती शास्त्रीय दृष्टिकोनातील उपाय योजना नुसार करण्यात आली संपूर्ण शरीराला प्लास्टिकचे कापड तोंडाला मास डोक्याला टोपी व पायाला मोजे संपूर्णपणे उपाययोजना केल्यानंतरच या सहा-सात लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दफनविधी पार पडला.

*आतातरी जागे व्हा*..
जळगाव शहरातील मुस्लिम बांधवांना जळगाव मुस्लिम ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी नम्रतापूर्वक आव्हान केले आहे की जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण आपापल्या घरात थांबा, कोणीही घराच्या बाहेर येऊ नका ज्या कुणाला अत्यंत तातडीची गरज असेल अथवा मदत असेल त्यांनी आम्हास आमच्या मोबाईल क्रमांक 94 231 85 786 अथवा 88 88025786 वर संपर्क साधावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे
*जिल्हा प्रशासनाचे आभार*
सदर मृत व्यक्ति साठी शासना कड़े म्हणजे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकने, उप जिल्हा अधिकारी सौ दीपमाला चौरे,डीन डॉ भास्कर खैरे, आर एम ओ डॉ किरण पाटिल,पो. नि. रणजीत शिरसाट,अकबर पटेल,ससे यांनी त्वरित सहकार्य केल्या बद्दल फारूक शेख यांनी त्यांचे आभार मानले