Home महाराष्ट्र हमाल,हंगामी कर्मचाऱ्यांना विशेष फंडातून आर्थीक मदत द्या…..

हमाल,हंगामी कर्मचाऱ्यांना विशेष फंडातून आर्थीक मदत द्या…..

38
0

युवक काँग्रेस प्रदेश सचिव निनाद मानकर यांनी केली मागणी…..

अकोट

देवानंद खिरकर
कृषी उत्पन्न बाजार समिती मधे कार्यरत हमाल,कामगार तसेच हंगामी कर्मचारांना बाजार समितीच्या वतीने व राज्य शासनाच्या विशेष फंडातून आर्थीक मदत देण्याची मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निनाद मानकर यांनी केली आहे.कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मधे अविरत सेवा देणारे हमाल कामगार व हंगामी कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली असुन त्याच पालन पोषण करणारी धान्य बाजार समिती कोरोना च्या संकटामुळे बंद असल्या कारणामुळे बाजार समितीच्या भरवशावर ज्या हमाल कामगाराचा उदरनिर्वाह आहे.अशा आपल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मधिल लायसन्स धारक हमाल कामगार व हंगामी कर्मचारी यांना बाजार समितीच्या व राज्यशासनाच्या विशेष फंडातून मदत द्यावी अशी मागणी पालकमंत्री बच्चू कडु,विश्वजित कदम,जिल्हाधिकारी अकोला यांच्यासह अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना दिलेल्या निवेदनातून निनाद मानकर यांनी केली आहे.

Unlimited Reseller Hosting