Home महाराष्ट्र बंद दरम्यान अवैध दारू विक्रीला ऊधान आरोपी किरण तोताराम भोपळे कडून...

बंद दरम्यान अवैध दारू विक्रीला ऊधान आरोपी किरण तोताराम भोपळे कडून 15 लिटर गावठी दारू जप्त

12
0

देवानद खिरकर

हिवरखेड ,

स्वस्तिक कॉलोनी हिवरखेड येथील किरण तोताराम भोपळे (वय 28) याला पोलिसांनी बंदच्या काळात विक्रीसाठी आणून ठेवलेली अवैध गावठी दारूसह रंगेहाथ पकडून प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आहे.
संपूर्ण हकीकत अशी की कोरोना या भयानक साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी लागू असताना जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठ बंद आहेत. याचा गैरफायदा घेऊन हिवरखेड येथील स्वस्तिक कॉलनी येथे किरण तोताराम भोपळे हा अवैधरित्या खुलेआम गावठी दारू बिनधास्त विकत होता. याची गोपनीय माहिती काही जागरुक नागरिकांकडून हिवरखेड पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकून आरोपी किरण तोताराम भोपळे यास विक्रीसाठी अवैध गावठी दारू बाळगताना रंगेहाथ पकडून झडती घेतली असता त्याच्याकडून 15 लिटर गावठी दारु (किंमत 1500 रुपये) जप्त करून त्याच्या मुसक्या आवळल्या. आणि त्याच्यावर दारूबंदी कायदा कलम 65 नुसार गुन्हा नोंदविला असून ही कारवाई ठाणेदार आशिष लवंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार महादेव नेव्हारे, विनोद गोलाईत, इत्यादींनी केली.