Home महत्वाची बातमी संपूर्ण गांव संचारबंदीच पालन करत असतांना तळेगावातील सी डेट कंपनी सुरु कशी?

संपूर्ण गांव संचारबंदीच पालन करत असतांना तळेगावातील सी डेट कंपनी सुरु कशी?

76
0

वर्धा , दि. ०२ :- जीवनावश्यक नसतांना सी डेट कंपनी राजरोसपने सुरु आहे ज्यात गावातील तसेच परगावातील शेकडो मंजूर कामानिमित्त एकत्र होत आहे .

गावात संचारबंदीचे लहान व्यावसायिक , नागरिकांकडून काटेकोर पणे पालन सुरु असतांना कंपनीला एवढी मोठी धोकादायक सूट का बर देण्यात आली ? असा प्रश्न नागरिक करीत आहे ? या बाबतची माहिती घेन्याकरिता गेलो असता कंपनीतील कामगार वर्ग कंपनीत येजा करतांनी आढळले या बाबतची कंपनिच्या गेट वर विचारना करन्याकरिता स्थानीक पत्रकार गेले असता तेथील कंपनिचा कर्मचारी चमनसिंग चहल यांनि कंपनिच्या आत येन्यास मनाई केली व कोनतीहि माहिती न देता धुडकाउन लावले

नकळत तेथूनच गावात संसर्ग पसरल्यास याची जबाबदारी कोणाची असेल ? कंपनीच्या थोडक्या चुकेची पुर्ण गावाला परिसराला फार मोठी किम्मत चुकवावी लागली तर कोन अधिकारी जबाबदार असेल ? कंपनी सुरु ठेवायची असेल तर लहान व्यावसायिक आप आपले प्रतिष्ठान सुरु करण्याच्या मानसिकतेत असल्याचे कळते जर प्रशासन एका प्राइवेट एवढ्या मोठ्या कंपनीला परवानगी देत असेल तर आम्हाला पण द्यावी अशी मागणी तळेगांवातील लहान मोठे व्यावसायीक करित आहे .

कंपनीत मिळाला होम कोरंटाईन मधे असलेला कर्मचारी

कालपासून सिडेट कंपनीतील कामकाजाला सुरुवात झाली असून त्यामध्ये काम करणारा एक इंजिनियर नागपूर येथून आला होता तो होम कोरंटाईन मध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली असता आरोग्य विभागाचे कर्मचारी कंपनी मध्ये जाऊन त्याची तपासणी करून त्याला होम करण टाईमचा शिक्का मारून त्याच्या स्वगृही परत पाठविले.अशी माहिती आरोग्य सेवक संदीप खारडे यांनी दिली.

रविंद्र साखरे सह इकबाल शेख 9890777242 / 9834453404