Home मराठवाडा बदनापूर येथे सर्व धार्मिक स्थळांची पोलिसांनी केली तपासणी ,

बदनापूर येथे सर्व धार्मिक स्थळांची पोलिसांनी केली तपासणी ,

272
0

सय्यद नजाकत ,

बदनापूर/प्रतिनिधी

दिल्ली येथील मर्कज निजामोद्दीन जमात प्रकरण उजेळात आल्यानंतर खळबळ उडाली असून जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांनी खबरदारी म्हणून सर्व मस्जिदी, मंदिरे तपासण्याच्या सूचना दिल्याने 1 एप्रिल रोजी बदनापूर शहरासह तालुक्यातील धार्मिक स्थळांची तपासणी करण्यात आली आहे

दिल्ली येथील मर्कज निजामोद्दीन मध्ये तब्लिगी जमात एकत्रित आल्याने व त्यामधील काही नागरिकांना कोरोना रोगाची लागण झाल्याचा संशय आल्याने देशभर खळबळ उडाली असून या जमात मधील लोकांचा शोध घेण्याची कार्य युद्धस्तरावर सुरू आहे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा देखील शोध घेण्याचा काम केला जात आहे

कोरोना रोगाचा प्रदुभाव वाढू नये म्हणून नागरिकांना एकत्रित येण्यावर प्रतिबंध लावण्यात आले असून सर्व मंदिरे,मस्जिदी व इतर धार्मिक स्थळांमध्ये केवळ चार लोकांच्या वर प्रार्थना करण्यासाठी येऊ नये असे सूचित करण्यात आलेले असतांना दिल्ली मर्कज मध्ये तब्लिगी ईस्तेमासाठी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित आल्याने खळबळ उडाली आहे

दिल्ली प्रकरण पुढे आल्याने जालना जिल्ह्यत खबरदारी उपाय म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांनी पोलिसांना योग्यत्या सूचना दिल्याने 1 एप्रिल रोजी बदनापूर पोलीस निरीक्षक एम बी खेडकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम व इतर कर्मचर्यानी बदनापूर शहरासह तालुक्यातील मस्जिदी,मंदिरे व इतर धार्मिक स्थळांची तपासणी करून सर्वांना सूचना दिल्या आहेत

******

पोलीस व नगर पंचायत चे आव्हान

दिल्ली इजतेमा जमात मध्ये किंवा त्या जमात मध्ये गेलेल्या लोकांच्या संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांनी स्वतः पोलीस किंवा नगर पंचायत ला कळवावे असे आव्हान पोलीस निरीक्षक एम बी खेडकर व नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांनी केले आहे