सययद नजाकत ,
बदनापूर/प्रतिनिधी

कोरोना रोगामुळे खासगी दुचाकी,चारचाकी वाहनावर बंदी घातलेली असतांना वाहनधारक बिनधास्तपणे वाहने घेऊन फिरत असल्याने पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांनी ताठर भूमिका घेतली असून बदनापूर शहरात फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याची सूचना दिल्याने पोलीस अधिकारी व कर्मचार्यानि 20 दुचाकी जप्त केल्याने रिकामटेकड्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे
कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून शासनाने गर्दी न करण्याचे आदेश देऊन दुचाकी,चारचाकी खासगी वाहने रस्त्यावर दिसणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिलेले असतांना काही मंडळी विनाकारण दुचाकी,तीनचाकी वाहने घेऊन हिंडत आहे त्यामुळे जागोजागी गर्दी होत असल्याने बदनापूर पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांनी ताठर भूमिका घेतली असून 1 एप्रिल रोजी रस्त्यावर विनापरवाना दुचाकी व इतर वाहने घेऊन हिंडणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश अधिकारी व कर्मचर्याना दिले
आदेश मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज भिमाळे, पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील,शेख इब्राहिम,काळूशे एस जे,हरकळ आर आर,शेख इस्माईल,रियाज पठाण,अंभोरे पी ए यांनी बदनापूर शहरात विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्या 20 वाहनधारकांना व 1 ऐपे रिक्षाला पकडून जप्त केले,पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी,तीन चाकी वाहनधारका विरुद्ध कारवाई सुरू केल्याने खळबळ उडाली आहे

