Home विदर्भ पोलिसांचे नाव घेताच नागरिक भीतीने चळचळा कापतात, तेच पोलीस कर्मचारी भिकाशिंग जाधव...

पोलिसांचे नाव घेताच नागरिक भीतीने चळचळा कापतात, तेच पोलीस कर्मचारी भिकाशिंग जाधव दिलदार मित्रासारखे चक्क नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करतांना

135
0

पवन जाधव

अकोला – कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान या अडचणीत असलेल्या मजुरांच्या मदतीसाठी लॉक डाऊनच्या कालावधीत ग्रामीण भागातील गोरगरिबांची परिस्थीती लक्षात घेता बार्शीटाकळी तालुक्यातील महान पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी भिकाशिंग जाधव यांनी महान येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाट करत असून अधिकारी पोलिस कर्मचारी रविवार दि. 29 मार्च रोजी सकाळी गोरगरीब मजूरांना प्रत्येकी पाच किलो गहु तीन किलो तांदुळ खाद्य तेल साखर तांदुळाचे विनामूल्य वाटप केले आणि मानुसकीचे दर्शन घडविले त्यांचा हा उपक्रम इतरांसमोर प्रेरणादायी ठरत आहे या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरात गरीब आणि मजुर वर्ग राहात असल्याने यांना गहु तांदुळ साखर तेल एकुण 35 कुटूंबाना दैनंदिन अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले त्यांना पाच किलो गहु तिन किलो तांदुळ खाद्य तेल साखर वाटप केले पी एस आय विकास राठोड जमदार रमेश राठोड भिकासिंग जाधव संतोष हीरळकर बेलुरकर भारतीताई चव्हाण यांनी वाटप केले.

Unlimited Reseller Hosting