Home सोलापुर अश्पाक मुल्ला  यांच्यावतीने  शिरवळ येथील ग्राम सुरक्षा दल पदाधिकारी वर्गाला कोरोना  प्रतिबंधात्मक...

अश्पाक मुल्ला  यांच्यावतीने  शिरवळ येथील ग्राम सुरक्षा दल पदाधिकारी वर्गाला कोरोना  प्रतिबंधात्मक मास्कचे वाटप

98
0

वागदरी /नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुका शिरवळ येथील आज 24 तास न्युज चे अक्कलकोट प्रतिनिधी अश्पाक मुल्ला यांच्याकडून शिरवळ येथील ग्राम सुरक्षा दल पदाधिकारी वर्गाला कोरोना प्रतिबंधात्मक मास्क चे वाटप सरपंच श्री बसवराज तानवडे,अप्पासाहेब बिराजदार ,अशपाक मुल्ला यांच्या हस्ते सर्वांना वाटप करण्यात आले यावेळी तंटामुक्त अध्यक्ष अप्पाशा देवकर, पोलीस पाटील हुसेनी कारंजे, महेश पाटील ,ग्रामपंचायत कर्मचारी त्याच बरोबर शिरवळ येथे ग्राम सुरक्षा दल चे निवडून दिलेले ग्राम सुरक्षा दल चे पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .
यावेळी बोलताना अप्पासाहेब बिराजदार म्हणाले की भारतामध्ये कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिबंधक म्हणून ग्राम सुरक्षा दल मधील पदाधिकारी वर्गाला आणि गावातील नागरिक यांना मास्क यांचे वाटप करण्यात आले सध्या महाराष्ट्रात सरकारने कोरोना विषाणू संदर्भात पेपर, टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरती कशा प्रकारे आळा घालण्यात येते याची माहिती देत आहेत
तसेच कोरोना संदर्भात कोणत्याही प्रकारची अफवा सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसार करू नये कोरोना व्हायरस हा गंभीर असून सर्वांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची (तबीयत) काळजी घ्यावी असे ही बिराजदार यांनी सांगितले.

हा कार्यक्रमला प्रमुख सुरज सोनके ,पोलीस पाटील हुसेनी कारंजे , तंटामुक्त अध्यक्ष आप्पाशा देवकर दिपक कवडे, बाबु हळळुरे आदी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting