महाराष्ट्र

लॉकडाऊनमुळे पत्रकारिता आर्थिक संकटात हीच ती वेळ आहे मदतीची…!

Advertisements

एक पत्रकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे पत्रकारिता क्षेत्रात प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहेत वृत्तपत्र कार्यालयातील कर्मचारी छपाई विभागातील कर्मचारी आणि टेबल वर्किंग वर काम करणाऱ्या पत्रकारांच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण झाली आहेत अनेक वृत्तपत्रे प्रकाशापासून अलिप्त होऊ लागले आहेत तर अनेक वृत्तपत्र आर्थिक संकटात सापडले आहे या राजकारण्यांना याच पत्रकारितेने आतापर्यंत सहकार्य केले त्या राजकारण्यांनी अशा संकटाच्या वेळी पत्रकारांसाठी धावून येणे खूप गरजेचे झाले आहे अनेक वृत्तपत्रांच्या जाहिरात बाक्या अजूनही मिळालेल्या नाहीत बंद अवस्थेत असलेल्या या वृत्तपत्रांच्या कार्यालयात कर्मचारी हताश होऊन पुढे काय करायचे या चिंतेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांसाठी जीव तोडून काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाकडून अद्याप तरी कुठलीही मदत जाहीर झालेली नाही उपाशीपोटी राहून पत्रकारितेचे व्रत कसे पूर्ण करणार हाही प्रश्न स्वतः लागला आहे पत्रकारांच्या आर्थिक विवंचनेत मुळे त्याचे अख्खे कुटुंब देखील अडचणीत सापडले आहे अशावेळी राजकारण्यांनी आपल्याकडे असलेल्या आर्थिक बाक्या तात्काळ देऊन पत्रकारिता क्षेत्रात हे योगदान द्यावे शासनाने देखील प्रत्येक पत्रकारास पाच हजार रुपये आणि जीवनावश्यक वस्तू देऊन या संकटातून बाहेर येण्यासाठी धीर द्यावा एवढी माफक अपेक्षा केली जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना जाहीर केलेल्या मदतीमध्ये राज्य सरकार कडून पत्रकारांसाठी अशी घोषणा केली तर अशा संकटसमयी यातून पत्रकारांना दिलासा मिळेल मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये काम करत असणाऱ्या लोकांना उपासमारीची वेळ येणार नाही मात्र छोटे वृत्तपत्र आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यावर हे संकट कोसळणार आहे तेव्हा हा राजकारण्यांनी आणि सरकारनेही ही याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी आशा वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांकडून केली जात आहे शहरी भागातच पत्रकारिता आहे असे नाही तर ग्रामीण भागातही पत्रकारांची संख्या अधिक आहे त्याच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी मदतीची खूप गरज निर्माण झाली आहे.

You may also like

महाराष्ट्र

रावण दहन केल्यास भिम आर्मी तो कार्यक्रम उधळून लावणार .जिल्हाध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा इशारा

रावण दहन केल्यास भिम आर्मी तो कार्यक्रम उधळून लावणार .जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा इशारा ...
महाराष्ट्र

आ. पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मेंढपाळाणा मास्क वाटप

लोकनेते, विधानपरिषद सदस्य आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने मंगळवारी मेंढपाळांना मास्क वाटप ...
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदावर प्रा शिवाजी काटे यांची निवड

  निजाम पटेल , अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी , अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकरणीस प्रांताध्यक्ष नामदार ...