महत्वाची बातमी

पोलीसांनकडून पञकारांवर हल्ले तर पञकारांना मारहान करणार्या पोलीसांना चौकशी करून निलंबित करा – पञकार संरक्षण समिती

Advertisements
Advertisements

विनोद पञे

कोरोनामुळे भारतात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत पत्रकारांवरचा जुना राग काढण्याची एकही संधी पोलीस किंवा अधिकारी सोडत नाहीत असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
मागील दोन – तीन दिवसात किमान अशा घटना समोर आल्या आहेत .
ताजी घटना हिंगोलीतील न्यूज 18 लोकमतचे पत्रकार कन्हैयालाल खंडेलवाल यांना एका पीआयने आज बेदम मारहाण केली.
काही दिवसांपुर्वी वाहतुकीच्या संदर्भातली एक स्टोरी खंडेलवाल यांनी लावली होती.. तो राग डोक्यात ठेऊन ही मारहाण केली गेल्याचा स्थानिक पत्रकारांचा आरोप आहे..
अर्थात ही काही पहिली आणि एकमेव घटना नाही तर मागील दोन – तीन दिवसात असे प्रकार घडलेले आहेत..
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नृसिंह घोणे आपल्या कार्यालयात जात असताना त्यांना आडवून बेदम मारहाण केली गेली आहे .मी पत्रकार आहे, जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे असे वारंवार सांगत असतानाही पोलीस त्यांना मारहाण करीत राहिले.

राज्यात पत्रकारांवर पोलिसांकडून होणारे हल्ले संतापजनक आणि निषेधार्ह आहेत.. एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री जावडेकरजी पत्रकारांना मारहाण करणार्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे इशारे देतात पण पोलिसांवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही.. तेव्हा या प्रकरणाची मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालून पत्रकारांना मारहाण करणार्या पोलिसांची चौकशी करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी पत्रकार संरक्षण समिती चे संस्थापक / अध्यक्ष विनोद पञे , प्रदेश सचिव अनिल चौधरी यांनी निवेदन ईमेल व्दारे पाठवून केली आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...