Home मराठवाडा अन , औरंगाबाद मध्ये विडिओ कॉलिंग वर पार पडला लग्न सोहळा ???

अन , औरंगाबाद मध्ये विडिओ कॉलिंग वर पार पडला लग्न सोहळा ???

211

अमीन शाह

फोनवर तिहेरी तलाखची अनेक प्रकरणं आपलं पहिली असतील. परंतु औरंगाबाद येथे एक असे प्रकरण समोर आले आहे, जेथे एका व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मुस्लिम मुला-मुलीने लग्न केले. 27 मार्च रोजी झालेल्या विवाहात घरातील वडिलधाऱ्यांचाच सहभाग होता. कोरोना साथीच्या दरम्यान, व्हिडिओ कॉलवरून झालेल्या या लग्नाची आता सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे आणि सर्वत्र संचार बंदी आहे. लोकांनी लग्नासाठी अनेक फंक्शन हॉल बुक केले होते. पण कोरोना विषाणूमुळे विवाह सोहळ्याविरुद्ध नोटीस काढली आहे. ज्यानंतर लोकांनी विवाह रद्द केले, परंतु असे काही लोक आहेत,जे कोणताही गाजावाजा न करता कमी खर्चात लॉकडाउन दरम्यान विवाह करत आहेत.
असाच एक विवाह औरंगाबादच्या बुद्दी लाइन भागातील एका घरात झाला. मोहम्मद मिनहाज उद्दीनने पूर्ण रीतीप्रमाणे फुलांचा हार घालून विवाह केला. मिनहाजची पत्नी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आहे. कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन आहे, ज्यामुळे नवरदेव त्याच्या मिरवणुकीसह बीडला जाऊ शकला नाही. यावर , कुटुंबाने तोडगा सापडत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून, वधूला व्हिडिओ कॉल केला गेला आणि लग्नास सहमती घेतली. मग वधूच्या संमतीनंतर काझी यांनी वधू-वरांचे लग्न लावले. त्याचप्रमाणे घरी बसलेल्या काही लोकांच्या उपस्थितीत फोनवर व्हिडिओ कॉल करण्यात आला. दरम्यान, या लग्नासाठी कार्डे छापली नव्हती किंवा कोणालाही लग्नाची मेजवानी दिली नव्हती. हे लग्न पैसे खर्च न करता फोनवर व्हिडिओ कॉलद्वारे केले गेले आहे.
वराचे वडील मोहम्मद गायझ यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलाचे लग्न 6 महिन्यांपूर्वीच ठरले होते आणि गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व तयारीही सुरू होती. परंतु देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला, त्यानंतर देशात लॉकडाऊन झाला, त्या दृष्टीने घराची मोठी माणसे जमली आणि मुलीच्या मोबाइल फोनवर व्हीडिओ कॉल करून निकाह करण्यात आला. लग्न लावणाऱ्या काझी यांनी सांगितले की, लग्नाची तारीख अगोदर निश्चित केली होती. दोन्ही कुटूंबातील लोकांनी एकमेकांच्या सहकार्याने फोनद्वारे मुला-मुलीचे लग्न केले आहे. हे लग्न अतिशय साधेपणाने आणि कमी खर्चात केले गेले आहे आणि दोन्ही कुटुंब आनंदी आहेत ही देखील आनंदाची बाब आहे.
लॉकडाऊनमुळे असाच एक निकाह बिहारमधील बेगूसरायमध्येही झाला. जिथे दोन्ही बहिणींचा ऑनलाइन विवाह केला गेला. मौलवींनी लॅपटॉपवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या दोन बहिणींच्या लग्नाचे विधी पूर्ण केले. असे सांगितले जात की, नगमा परवीन आणि राहत परवीन या दोन्ही बहिणींचे लग्न 25 तारखेला निश्चित झाले होते, परंतु कोरोना विषाणूमुळे देश 21 दिवस लॉकडाउनमध्ये आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी लॉकडाउनला पाठिंबा देण्याचे तसेच जन जागरणसाठी ऑनलाईन विवाह करण्याचे ठरविले. यानंतर 25 मार्च रोजी संध्याकाळी मोहम्मद वली अहमद कुरेशी उर्फ छोटा याची मोठी मुलगी नगमा परवीनचे लग्न नालंदा जिल्ह्यातील शमशादसोबत झाले आणि दुसरी मुलगी राहत परवीनचे शाहनवाज आलमबरोबर लग्न झाले.