Home महत्वाची बातमी शिव भोजन थाळी अता 5 रुपयात मिळणार ???

शिव भोजन थाळी अता 5 रुपयात मिळणार ???

51
0

मजूर कामगारांसाठी शिवभोजन थाळीचा विस्तार

अमीन शाह ,

मुंबई : कोरोनाच्या पार्शवभूमीवर मजूर कामगारांसाठी शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. आजपासून याची त्वरित अंमलबाजवणी करण्यात आली आहे. यानुसार शिवभोजन थाळी मिळण्याची वेळ वाढवण्यात आली आहे.
दहा रुपयांमध्ये मिळणाऱ्या शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली आहे. तसेच सुविधा केंद्रांची वेळ ११ ते ३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. दररोज एक लाख लोकांपर्यंत शिवभोजन थाळी पोहोचवण्यात येणार आहे. कोरोनच्या पर्शवभूमीवर कामागर, मजूर यांची उपासमार होऊ नये यांसाठी ही सोय करण्यात आली आहे.
शिवभोजन थाळी फूड पॅकेट्स स्वरूपात पोहोचविण्यात येणार आहे. जेणेकरून गर्दी होणार नाही. कोरोनाच्या पर्शवभूमीवर सर्व केंद्रात सॅनिटायझर्सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

Unlimited Reseller Hosting