
सर्वत्र भीतीचे वातावरण ,
रावेर (शरीफ शेख)
जळगाव शहरातील मेहरून भागातील 45 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाले आहे. काल सामान्य रुग्णालयात त्याने तपासणी केली असता त्याचे घशातील द्रवाचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले होते आज संध्याकाळी उशिरा हे नमुने पॉझिटिव आल्याने त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मेहरूण भागात ज्या ठिकाणी तो राहतो त्या त्या भागाला सनेटाईझ करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांनी माहिती सांगताना अधिक माहिती देताना असे सांगितले की प्रादुर्भाव झालेल्या या रुग्णाच्या परिसराला सॅनेटाइझड करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिले असून माननीय जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी पोलिसांना द्वारे सदरहू रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात आणण्याच्या सूचना केल्या आहेत. जळगाव शहरात पहिला कोरोना रुग्ण सापडल्यामुळे खळबळ माजली आहे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.