Home जळगाव इस्लामिक यूथ फेडरेशन तर्फे अन्य धान्य घरपोच सेवा

इस्लामिक यूथ फेडरेशन तर्फे अन्य धान्य घरपोच सेवा

136
0

असोसिएशन ऑफ इंडियन मुस्लिम असोसिएशन यांचा सेवाभावी उपक्रम…

रावेर(शरीफ शेख)

कोरोना व्हायर्स चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लॉक डाऊन मुळे गोरगरिबांना अन्य धान्यासह इतर सामानाची अडचण निर्माण होत आहे त्यात काही व्यापारी त्याचा गैरफायदा घेत आहे मात्र इंडियन इस्लामिक यूथ फेडरेशन यांच्यातर्फे हात मजुरी करणाऱ्यांसाठी घरपोच अन्नधान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे सध्या काम नसल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे यासाठी या तरुणांनी एकत्र येऊन गरजू परिवारास दहा किलो पीठ, पाच किलो तांदूळ ,तीन किलो तुरदाळ, दोन किलो गोडेतेल, चहा पत्ती या वस्तूंची सेवा घरपोच करून देत आहात

यासाठी अध्यक्ष उमर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी जळगाव शहरातील परिसर निहाय गरजू लोकांची यादी तयार केली व त्याप्रमाणे त्या-त्या परिसरातील सामाजिक संघटनेवर ही जबाबदारी टाकली.
इस्लामिक फेडरेशनचे एकूण 14 सदस्य असून त्यात प्रामुख्याने यांचा समावेश आहे उमर शेख मुस्तफीज शेख ,ताबिश खान, हसन शेख, जुबेर शेख, तारीक शेख, नइम शेख, खालीद शेख ,वकार शेख ,फैजान शेख, सज्जाद खान, हे सर्व तरुण संपूर्ण जळगाव शहर येथे गरजवंतांना आपले अन्न धान्य देत आहे.