Home सोलापुर अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांडा येथील त्या 29 लोकांना क्वारंटाईनमध्ये हलविले.

अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांडा येथील त्या 29 लोकांना क्वारंटाईनमध्ये हलविले.

73
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांडा येथे इस्लामपूर जि सांगलीहुन २९ लोक आले आहेत. ते मूळचे किणीमोड तांडा येथील रहिवासी असून कामानिमित्त इस्लामपूर येथे वास्तव्यास होते.

सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ येथील कर्मचारी आलेल्या लोकांना शिक्के मारून तपासणी साठी पाठवत आहेत.यावेळी पोलीस प्रशासन ही उपस्थित होते.
देशात सध्या कोरोना विषाणूचा थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने महाराष्ट्रत अपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणत्याही तपासणी शिवाय शहरातील नागरिकांना गावात प्रवेश दिले जात नाही. त्यामुळे सध्या इस्लामपूर मध्ये कोरोना आजाराने एकाच कुटुंबातील २३ जणाना बाधा झाले आहे. खबारदारीचा उपाय म्हणुन इस्लामपूर हुन किणीमोड तांडा येथे आलेल्या २९ जणाच्या हातावर शिक्का मारून केगाव येथील क्वारंटाईन मध्ये हलविण्यात आले आहे. सध्या तरी अक्कलकोट तालुक्यात एकही रूग्ण नाही.प्रशासन जोखिम स्विकारण्यास तयार नाही. या पुढे ही कठिण निर्णय घेण्यास मागेपुढे पहाणार नाही.